अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलेला नाही; त्या सर्व अफवा.

Coronavirus False

अमिताभ बच्चन व त्यांचे कुटुंबीय कोरोना संक्रमित झाल्यापासून मुंबईच्या नानावती रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांच्या तब्येतीची इत्थंभूत माहिती माध्यमांद्वारे त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचविली जात आहेत. अशातच गुरुवारी अनेक न्यूज चॅनेल्सने बातमी दिली की, अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून, लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार.

परंतु, ही बातमी खोटी असल्याचे समोर आले. खुद्ध अमिताभ यांनी निगेटिव्ह रिपोर्टची माहिती निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे.

काय आहे पोस्टमध्ये?

मूळ बातमी येते वाचा – बातमीपत्रफेसबुकअर्काइव्ह

हीच बातमी लोकसत्ता आणि  पीसीबी टुडेनेदेखील (अर्काइव्ह) दिली होती. त्यांनी एबीपी माझाच्या बातमीचा दाखला दिला; परंतु, एबीपी माझाने ती बातमी डिलीट केली. लागोपाठ लोकसत्तासुद्धा त्यांची बातमी डिलीट केली. 

टीव्ही 9 मराठीच्या रिपोर्टरने नानावती रुग्णालयाच्या बाहेरूनची ही माहिती दिली होती की, अमिताभ यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना रात्रीच डिस्चार्ज देण्यात येणार आहे. 

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

अमिताभ बच्चन गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोनानिमित्त उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती सुधारत असून, ते ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाददेखील साधतात. त्यांच्या तब्येतीविषयी जेव्हा गुरुवारी अनेक माध्यमांनी चुकीच्या बातम्या देणे सुरू केले तेव्हा बिग बी यांनी स्वतः त्याचे खंडन केले.

टाईम्स नाऊ वाहिनीवर अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे दाखवण्यात येते होते. या बातमीच्या व्हिडियोला उत्तर देताना अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले की, ‘हे वृत्त असत्य आहे. अशी बातमी देणे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे’

अर्काइव्ह

स्वतः अमिताभ बच्चन यांनी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे वृत्त फेक असल्याचे स्पष्ट केल्यानंतर अनेक माध्यमांनी आपल्या आधीच्या बातम्या डिलीट केल्या. अनेकांनी बिग बींचा खुलासा छापला. परंतु, सोशल मीडियावर अजूनही बिग बींचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती पसरत आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, अमिताभ यांचा रिपोर्ट अद्याप निगेटिव्ह आलेला नाही. 

मूळ बातमी येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडिया

अमिताभ बच्चन यांच्या ट्विटनंतर लोकसत्ता आणि टीव्ही-9 मराठीनेसुद्धा बातमी केली की, “कोरोना रिपोर्ट निगेटिव्हच्या बातम्या खोट्या आणि बेजबाबदार, अमिताभ बच्चन यांचं स्पष्टीकरण”. 

निष्कर्ष

अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची खोटी बातमी अनेक प्रसारमाध्यमांनी दिली होती. स्वतः अमिताभ बच्चन यांनी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे वृत्त फेक असल्याचे सांगितले आहे.

Avatar

Title:अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलेला नाही; त्या सर्व अफवा.

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False