सत्य पडताळणी : अखेर सलमान खान आणि कॅटरिना कैफचे होणार लग्न?

False Headline

अभिनेता सलमान खान आणि कॅटरिना कैफ विवाहबध्द होणार असल्याचे शीर्षक असलेले वृत्त मराठी मीडिया या संकेतस्थळाने दिले आहे. या शीर्षकातील तथ्य पडताळणी फॅक्ट क्रिसेंडोने केली आहे.

आक्राईव्ह लिंक

फेसबुकवर या वृत्ताच्या पोस्टला 2 हजार 200 लाईक्स आहेत. या वृत्तावर 24 जणांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हे वृत्त 9 जणांनी शेअर केले आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

डेली हंट या संकेतस्थळाने ही आपल्या शीर्षकात अखेर सलमान खान आणि कॅटरिना कैफचे होणार लग्न असे म्हटले आहे. या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तात सलमान खानच्या आगामी भारत या चित्रपटात हे लग्नाचे दृश्य असणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

आक्राईव्ह लिंक 

IBC24 या वृत्तवाहिनीनेही सलमान आणि कॅटरिना कैफ विवाहबध्द होणार असल्याचे वृत्त दिले आहे. या वृत्तात भारत या चित्रपटात हे दोघे विवाहबध्द होणार असल्याचे म्हटले आहे. या चित्रपटातील हा एक प्रसंग असणार असल्याचेही या वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे. हे तुम्ही 1 मिनिट 48 सेकंद ते 2 मिनिट या कालावधीत ऐकू शकता.

इंडिया टूडेच्या संकेतस्थळाने कॅटरिना कैफला विवाहबद्दलचा प्रश्न विचारण्यात आल्याचे एक वृत्त दिनांक 18 फेब्रुवारी 2019 रोजी दिले आहे. या वृत्तात कॅटरिना कैफ ही अभिनेता सलमान खान याच्यासोबत भारत या चित्रपटात काम करत असल्याचे म्हटले आहे. विवाहबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना कॅटरिना कैफ हिने आपण सलमान खानसोबत विवाह करत असल्याचे कुठेही म्हटलेले नाही. योग्य जोडीदार मिळाल्यावर आपण विवाहबध्द होऊ असे तिने स्पष्ट केले आहे.

आक्राईव्ह लिंक

द ट्रिब्यूननेही याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्ताच्या शीर्षकातच ते भारतमध्ये विवावहबध्द होणार असल्याचे म्हटले आहे. या वृत्तातही ते एका चित्रपटाच्या दृश्यात विवाहबध्द होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आक्राईव्ह लिंक

निष्कर्ष

अखेर सलमान खान आणि कॅटरिना कैफचे होणार लग्न? हे मराठी मीडिया या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्ताचे शीर्षक चुकीचे आहे. अभिनेता सलमान खान आणि कॅटरिना कैफ हे चित्रपटातील एका प्रसंगात विवाहबध्द होणार असल्याने या वृत्ताचे शीर्षक चुकीचे आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : अखेर सलमान खान आणि कॅटरिना कैफचे होणार लग्न?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False Headline