योगी आदित्यनाथ यांच्यासोबत असणाऱ्या या व्यक्तीचा कानपूर चकमकीशी संबंध नाही, वाचा सत्य

False राजकीय | Political

उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात पोलीस उपअधिक्षकासह 8 पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे याच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजय बिष्ट उर्फ योगी आदित्यनाथ म्हणून सध्या समाजमाध्यमात सध्या एक छायाचित्र व्हायरल होत आहे. छायाचित्रातील व्यक्ती ही कानपूरचा गॅंगस्टर विकास दुबे आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

vikas Dube.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी 

हे छायाचित्र नेमके कोणाचे आहे, याचा शोध घेतला. त्यावेळी विकास दुबे, भाजप यांच्या फेसबुक खात्यावर त्यांचे हे छायाचित्र दिसून आले. कानपूर-बुंदेलखंड क्षेत्रातील कानपूर विद्यापीठातील भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे ते माजी अध्यक्ष असल्याचेही दिसून आले. त्यांनी या छायाचित्रासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात समाजमाध्यमात मला नामसाम्य असल्याने आरोपी विकास दुबे ठरवत बदनाम करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. अशा रितीने चुकीची आणि असत्य माहिती पसवू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे

संग्रहित

याखेरीज एक व्हिडिओ बनवून देखील विकास दुबे यांनी स्पष्टीकरण दिले असल्याचे दिसून आले. याप्रकरणी आपण पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी या व्हिडिओत म्हटले आहे.

संग्रहित

हिन्दी खबर (संग्रहित) या संकेतस्थळावर कानपूरचा गॅंगस्टर विकास दुबे याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती देणारे वृत्त दिसून आले. हिन्दी खबर या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतही गॅगस्टर विकास दुबे आणि आपण वेगळे असल्याचे भाजयुमोचे विकास दुबे सांगत असल्याचे आपण खाली पाहू शकता.

संग्रहित

भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे विकास दुबे आणि गुन्हेगार विकास दुबे यांच्यातील फरक स्पष्ट करणारे छायाचित्र आपण खाली पाहू शकता.

Vikas Dube Vs Criminal Vikas Dube.png

निष्कर्ष

या माहितीतुन हे स्पष्ट झाले की, योगी आदित्यनाथ यांच्यासोबत असणारे विकास दुबे हे भाजप नेते आहेत. गॅंगस्टर विकास दुबे ही व्यक्ती वेगळी आहे. त्यांच्या नावात केवळ साम्य असून समाजमाध्यमात भाजपच्या विकास दुबेंबद्दल पसरत असलेली माहिती असत्य आहे.

Avatar

Title:योगी आदित्यनाथ यांच्यासोबत असणाऱ्या या व्यक्तीचा कानपूर चकमकीशी संबंध नाही, वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False