WHO च्या नावे लॉकडाऊन प्रोटोकॉल्सचा खोटा मेसेज व्हायरल. वाचा सत्य काय आहे

Coronavirus False
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी आता जगभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहेत. भारतातही 21 दिवसांची टाळेबंदी सुरू आहेत. त्यातच आता व्हायरल मेसेज फिरत आहेत की, जागतिक आरोग्य संघटनेने लॉकडाऊन विषयी प्रोटोकॉल्स जाहीर केले असून, त्यानुसार जून महिन्यापर्यंत लॉकडाऊन सुरू ठेवण्याची त्यात म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काय आहे पोस्टमध्ये?

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शकतत्त्वानुसार लॉकडाऊन पुढीलप्रमाणे विविध टप्प्यात लागू करावा असे म्हटले आहे.

 • टप्पा क्रमांक 1 – 1 दिवस
 • टप्पा क्रमांक 2 – 21 दिवस
 • (पाच दिवासांचा अवकाश)
 • टप्पा क्रमांक 3 – 28 दिवस
 • (पाच दिवसांचा अवकास)
 • टप्पा क्रमांक 4 – 15 दिवस

याच प्रोटोकॉल्सनुसार भारतातही लॉकडाऊन सुरू आहे. त्यानुसार 21 दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर 20 एप्रिल ते 18 मे दरम्यान पुन्हा 28 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात येईल. त्यानंतर मग 25 मे ते 10 जून असा शेवटचा 15 दिवसांचा लॉकडाऊन असेल.

8ce4af3c-6c80-4b6b-a4a8-7f550741c5b9.jpg

तथ्य पडताळणी

जागतिक आरोग्य संघटनेने खरंच असे काही प्रोटोकॉल्स जाहीर केलेत का हे तपासण्यासाठी WHO च्या वेबसाईटवर भेट दिली. तेथे अशी कोणतीही माहिती मिळाली नाही.

त्यानंतर WHO च्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही खोटी बातमी असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने लॉकडाऊनसंदर्भात कोणतेही प्रोटोकॉल्स जाहीर केलेले नाहीत. तसे सांगणारा मेसेज फेक आहे, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

अर्काइव्ह

भारत सरकारच्या पत्र व सूचना मंत्रालयानेदेखील हा मेसेज खोटा असल्याचे सांगितले आहे. 

अर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, सोशल मीडियावर फिरणारा मेसेज खोटा आहे. जागतिक आरोग्य संघटनेने लॉकडाऊन पाच टप्प्यात लागू करण्याविषयी कोणतेही प्रोटोकॉल्स जाहीर केलेले नाहीत.

Avatar

Title:WHO च्या नावे लॉकडाऊन प्रोटोकॉल्सचा खोटा मेसेज व्हायरल. वाचा सत्य काय आहे

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •