Fact Check : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उध्दव ठाकरेंची सभा पाहतानाचा हा व्हिडिओ खरा आहे का?

False राजकीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उध्दव ठाकरे यांनी युती तुटण्याचे स्पष्ट संकेत दिल्याचे पाहत असतानाचा एक व्हिडिओ Save Maharashtra From BJP या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उध्दव ठाकरे यांची सभा पाहतानाच्या या व्हिडिओत एका कोपऱ्यात एएनआय या वृत्तसंस्थेचे नावही दिसत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुक / Archive 
तथ्य पडताळणी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उध्दव ठाकरे यांची सभा पाहतानाच्या या व्हिडिओत एका कोपऱ्यात एएनआय या वृत्तसंस्थेचे नाव दिसत आहे. त्यामुळे आम्ही सर्वप्रथम एएनआय या वृत्तसंस्थेचे व्हिडिओ पाहिले. त्यात आम्हाला एएनआय या वृत्तसंस्थेचा खालील व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांद्रयान 2 या मोहिमेचे दुरदर्शन या सरकारी वाहिनीवरुन करण्यात येणारे थेट प्रक्षेपण पाहताना दिसत आहेत. 

यातून हे स्पष्ट झाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मूळ व्हिडिओत एडिटिंग करुन यात उध्दव ठाकरेंची सभा दाखविण्यात आली आहे. त्यानंतर आम्ही उध्दव ठाकरे यांचा हा मूळचा व्हिडिओ कधीचा आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला. 

उध्दव ठाकरेंकडून युती तुटण्याचे स्पष्ट संकेत हे शब्द टाकून आम्ही युटूयूबवर शोध घेतला. हा व्हिडिओ 26 जानेवारी 2017 रोजी म्हणजेच जवळपास अडीच वर्षापुर्वी एबीपी माझा या वृत्तवाहिनीने अपलोड केल्याचे दिसून आले. त्यामुळे उध्दव ठाकरेंनी नुकत्याच दिलेल्या इशाऱ्याचा हा व्हिडिओ नसल्याचेही स्पष्ट झाले. गोरेगाव, मुंबई येथील सभेचा हा व्हिडिओ असल्याचे दिसून येत आहे. आपण हा व्हिडिओ खाली पाहू शकता. 

या दोन्ही व्हिडिओची केलेली तुलनाही आपण खाली पाहू शकता. 

निष्कर्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहत असलेला मुळ व्हिडिओ चांद्रयान 2 या मोहिमेचा आहे. या मूळ व्हिडिओत फेरफार करुन त्याठिकाणी उध्दव ठाकरे यांच्या मुंबईतील गोरेगाव येथे अडीच वर्षापुर्वी झालेल्या सभेचा व्हिडिओ टाकण्यात आला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी उध्दव ठाकरेंनी युती तुटण्याचे स्पष्ट संकेत दिल्याचा संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळून आली आहे. 

Avatar

Title:Fact Check : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उध्दव ठाकरेंची सभा पाहतानाचा हा व्हिडिओ खरा आहे का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False