मुस्लिम व बौद्ध धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या बातमीचे कात्रण बनावट; वाचा सत्य

False सामाजिक

मुस्लिमांनी  बौद्ध समाजातील कोणत्याही व्यक्तीला कामावर ठेवू नये, असे कथित विधान मौलाना जाफर शेख यांनी केले अशा आशयाच्या बातमीचे कात्रण व्हायरल होत आहे. इंग्रजी बातमीचा दाखला देत दावा केला जात आहे की, मुस्लिमांनी बौद्ध किंवा SC/ST समाजातील कोणावरही विश्वास न ठेवण्याचा या मौलानांनी आदेश दिला आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या बातमीचे कात्रण आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, ही बातमी बनावट आहे. दोन समाजामधील सौहार्द बिघवडणाऱ्या या बातमीवर विश्वास ठेवू नये.

काय आहे दावा?

व्हायरल पोस्टमध्ये एका बातमीचे कात्रण आहे. त्या बातमीत म्हटले की, “मुस्लिमांनी कधीच बौद्ध SC ST मधील लोकांना कामावर ठेऊ नये”, असे विधान मौलाना जाफर शेख यांनी केले.

बातमीत पुढे म्हटले आहे की, “इतर धर्मियांना जास्त पगार ध्या परंतु ह्यांच्या वर भरोसा ठेऊ नका. हे लोक जिथे जातात तिथे चोऱ्या वाढतात. हेच लोक मुस्लिम व हिंदुंमध्ये भांडण लावतात.”

मग ही बातमी खरी आहे का?

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

इंटरनेटवर शोध घेतल्यावर अशा आशयाची कोणतीही अधिकृत माहिती किंवा बातमी सापडली नाही. मौलाना जफर शेख नावाच्या व्यक्तीने असे विधान केल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे या कात्रणाच्या सत्यतेविषयी शंका येते.

सदरील व्हायरल कात्रणाचे निरीक्षण केल्यावर स्पष्ट होते की, यामध्ये अधिकृत बातमीचा आराखडा किंवा नियमावलीचा लवलेशही नाही. उदाहरणार्थ,

1. वर्तमानपत्राचे नाव ‘द नवभारत’ असे वाटते. अशा फाँटमध्ये या नावाचा कोणताही पेपर नाही.

2. बातमीचे शीर्षक अर्धवट आहे.

3. मौलाना जफर शेख यांनी हे कथित विधान कुठे आणि कोणत्या कार्यक्रमात केले याचा तपशील बातमीत नाही. (म्हणजेच डेटलाईन नाही)

फॅक्ट क्रेसेंडोने यापूर्वीदेखील हे सिद्ध केलेले आहे की, अशा स्वरुपाचे न्यूजपेपर कात्रण ऑनलाई सॉफ्टवेअरच्या माध्यमाने तयार करता येतात. 

Newspaper Clipping Generator वेबसाईटवर वृत्तपत्र कात्रण (Newspaper Clipping) तयार करता येते. त्यासाठी केवळ वृत्तपत्राचे नाव, दिनांक, शीर्षक, मजकूर वेबसाईटवर लिहावे लागते. 

फॅक्ट क्रेसेंडोनेसुद्धा तसेच कात्रण तयार केले. खाली ते दिलेले आहे. तुलना केल्यावर लगेच लक्षात येते की, व्हायरल होत असलेली वादग्रस्त बातमी बनावट आहे.

तुम्ही पाहू शकता की, बातमीच्या उजव्या बाजूला मजकूर सारखाच आहे. म्हणजे केवळ पहिल्या दोन कॉलममधील मजूकर बदलता येते. ही एक फिक्स टेम्पलेट आहे.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, मौलाना जफर शेख नावाच्या व्यक्तीने मुस्लिमांना बौद्ध धर्मीयांना नोकरी न देण्याचे आवाहन केल्याची बातमी फेक आहे. ऑनलाईल अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीने तयार करण्यात आलेली बनावट बातमी व्हायरल होत आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:मुस्लिम व बौद्ध धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या बातमीचे कात्रण बनावट.

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False