तथ्य पडताळणीः मोदींना समर्थन करणाऱ्या मुस्लिम तरुणीचा खोटा फोटो व्हायरल

False आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

(Image is for representation purpose only. Modi photo Source: Scroll)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रामाणिक आणि भ्रष्टाचारमुक्त व्यक्तिमत्वाची प्रशंसा करणाऱ्या एका मुस्लिम तरुणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ही तरुणी हातात एक पोस्टर घेऊन उभी आहे. त्यावर मोदींच्या देशप्रेमाची स्तुती करण्यात आलेली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची तथ्य पडताळणी केली.

अर्काइव्ह

महा-राजकारण नामक फेसबुक पेजवरून 17 मार्च रोजी हा फोटो अपलोड करण्यात आला आहे. या फोटोमध्ये हिजाब परिधान केलेली एक मुस्लिम तरुणी दिसते. तिच्या हातातील पोस्टरवर लिहिलेले आहे की, मोदी  को अपना घर भरना होता तो वह १३ साल गुजरात का सीएम रह कर भर लेता. उसे कुर्सी से नहीं सिर्फ अपने देश से प्रेम है.  १००% सत्य (मोदींना जर भ्रष्टाचार करून संपत्ती कमवायची असती तर, ते त्यांनी गुजरातचे 13 वर्ष मुख्यमंत्री असतानाच केले असते. त्यांना सत्तेची लालसा नाही. त्यांचे देशावर नितांत प्रेम आहे. हे शंभर टक्के खरं आहे.)

फोटोवर भारतीय जनता पक्षाचे चिन्ह कमळ असून गुड्डू मौर्या असे लिहिलेले आहे. अनेकांनी या फोटोला सत्य मानून या मोदी आणि या तरुणीचे कौतुक करणाऱ्या कमेंट्स केले आहेत.

तथ्य पडताळणी

फॅक्ट क्रेसेंडोने सर्वप्रथम हा फोटो गुगल रिव्हिर्स इमेज सर्च केला. तेव्हा पिंटरेस्ट या वेबसाईटवरील खालील छायाचित्र समोर आले. या फोटमध्ये वरील फोटोप्रमाणे मोदींविषयी काहीच लिहिलेले नाही. पिंटरेस्टवरील या छायाचित्रात इंग्रजीत म्हटले की, “I’m a Muslim, but I’m not Arab.” (मी मुस्लिम आहे; पण मी अरब राष्ट्रातील नाही).

मूळ लिंक येथे पाहा – पिंटरेस्ट

या ओळींच्या खाली UMW ISA CAMPAIGN असे लिहिलेले आहे. ते गुगल वर सर्च केले असता इमेज सेक्शनमध्ये वरील फोटो आढळला. तो One Beauty of Islam या ब्लॉग पेजवरील आहे. 21 मे 2012 रोजी Don’t Stereotype Me – UMW 2012 Campaign या मथळ्याखाली केलेल्या ब्लॉग पोस्टमध्ये सदरील फोटो वापरण्यात आला आहे.

या ब्लॉगनुसार, मेरी वॉशिंग्टन विद्यापीठातील (UMW) इस्लामिक स्टुडंट असोसिएशनने (ISA) मार्च (2012) महिन्यात विद्यापीठात Don’t Stereotype Me हे अभियान चालविले होते. समाजामध्ये मुस्लिमांबाबत प्रचलित असणाऱ्या पूर्वग्रहांविषयी जनजागृती करण्याचा यामागे उद्देश होता.

अभियानांतर्गत मेरी वॉशिग्टन विद्यापीठातील काही मुस्लिम विद्यार्थ्यांनी कागदावर आपापले संदेश लिहिले होते. त्यांचे विविध फोटो या ब्लॉगपोस्टमध्ये दिलेले आहेत. हा ब्लॉग Riham नावाच्या व्यक्तीचा आहे. तिने ब्लॉगमध्ये असेदेखील म्हटले की, या अभियानाला विद्यापीठात आणि ऑनलाईन खूप प्रतिसाद लाभला. माझ्या टंम्बलर पेजवरील पोस्टला 6651 लाईक्स मिळाल्या

मूळ ब्लॉगपोस्ट येथे वाचा – One Beauty of Islamअर्काइव्ह

टंम्बलर पेज हा धागा पकडून मग आम्ही गुगलवर शोध घेतला. त्यातून टंम्बलर Heaven Is Where My Heart Is नामक एक पेज आढळले. हे पेजदेखील Riham नावाच्या मुलीचे आहे. तेथून मग या मुलीचे ट्विटर अकाउंट मिळाले. Riham Osman असे या मुलीचे नाव असून ती सध्या नेसले कंपनीत अमेरिकेत कार्यरत आहे.

तिच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार, ती 2009 ते 2013 दरम्यान मेरी वॉशिग्टन विद्यापीठाची विद्यार्थीनी होती. 2015 साली ती तत्कालिन राष्ट्रपती बराक ओबामा यांनादेखील भेटली होती. याविषयी युनिव्हर्सिटी ऑफ मेरी वॉशिंग्टन मॅगझिनमध्ये प्रसिद्ध लेखामध्ये सविस्तर वाचू शकता. यामध्येही तिला विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी म्हटले आहे. (अर्काइव्ह)

ट्विटरवर अ‍ॅडव्हान्स सर्च केले असता रिहामने 27 मार्च 2012 रोजी खालील ट्विट केल्याचे समोर आले. यात लिहिले की, मुस्लिम विद्यार्थ्यांनी पूर्वग्रहांविरोधात विरोधात अभियान राबविले. सोबत टंम्बलर पेजची लिंक शेयर केली होती. ही आता उपलब्ध नाही.

अर्काइव्ह

Yomna Abbass  युजरच्या ग्लुमी लाफ्टर नावाच्या ब्लॉगस्पॉटवरदेखील 27 एप्रिल 2012 रोजी या अभियानीतील फोटो अपलोड करण्यात आले होते. ते तुम्ही येथे पाहू शकता – ग्लुमी लाफ्टरअर्काइव्ह

शेवटी दोन्ही फोटोंची तुलना करून पाहुया.

निष्कर्ष

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीतून हे सिद्ध होते की, संबंधित मुस्लिम तरुणीचा फोटो 27 मार्च 2012 रोजी मेरी वॉशिग्टन विद्यापीठातील एका अभियानांतर्गत काढलेला आहे. याचा अर्थ की, मोदींचे समर्थन करतानाचा हा युवतीचा फोटो खोटा आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणीः मोदींना समर्थन करणाऱ्या मुस्लिम तरुणीचा खोटा फोटो व्हायरल

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •