इस्रायलने गाझा शहरावर केलेल्या हल्ल्याचा जुना व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य
हमास या पॅलेस्टिनी कट्टरपंथी संघटनेने इस्रायलवर शनिवारी मोठा दहशतवादी हल्ला केला. ज्यामध्ये 400 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता.
या पार्श्वभूमीवर काही ईमारतींवर हवाई हल्ला होतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला आहे की, हा व्हिडिओ इस्रायलने हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून असा केलेल्या हल्ल्याचा आहे.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ जुना आहे
काय आहे दावा?
व्हायरल व्हिडिओमध्ये एका शहरातील इमारतींवर हवाई हल्ला होतो.
राष्ट्रसंचार या मीडिया/वृत्त कंपनीने हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलेले की, “इस्रायलने केली 'ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स'ची घोषणा. इस्त्रायली हवाई दल पॅलेस्टाईनमधील गाझामधील लक्ष्यांवर बॉम्बफेक करत आहेत.”
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “हमासचा गाझा पट्टीवरुन इस्त्रायलवर हल्ला.”
मुळ पोस्ट – फेसबुक | फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ सध्याचा नाही.
असार ह्यूमैनिटी या चॅनलने 15 मे 2023 रोजी हा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला होता.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये इंडोनेशियन भाषेत लिहिले होते की, “झोपेत असताना बॉम्बस्फोट, 33 जण मरण पावले.”
मुळ पोस्ट – असार ह्यूमैनिटी
हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा होता, 13 मे रोजी उत्तर गाझामधील घरावर इस्रायलने हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यासाठी इस्रायलने 1000 क्षेपणास्त्रे डागले होते.
द गार्डियन न्यूज चॅनेलने अपलोड केलेला व्हिडिओ आणि संबंधित महिती आपण खाली पाहू शकतात.
गाझा हवाई हल्ला
इस्रायलने 13 मे रोजी पहाटेच्या सुमारास पॅलेस्टिनी पट्टीतील गाझा शहरावर हवाई हल्ला केला होता.
हा हल्ला रहिवासी झोपलेल्या अवस्थेत असताना झाला होता. या हल्ल्यात एकूण 33 गाझा रहिवासी मारले गेले आणि 147 जखमी झाले होते. तसेच 991 घरे उद्ध्वस्त झाली होती.
गाझा आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, “या घटनेमुळे महिला आणि अगदी लहान मुलांचाही मृत्यू झाला आहे.” अधिका माहिती आपण इथे पाहू शकतात.
सध्याची परिस्थिती
इस्रायलच्या सीमेवर हमास ही दहशतवादी संघटना आणि इस्रायली लष्करात युद्ध सुरू आहे. हमासच्या संघटनेने 7 ऑक्टोबर रोजी पहाटे इस्रायलवर अचानकपणे हल्ला केला होता. या वेळी हमासने इस्रायलवर 5 हजार स्फोटके डागले होती. या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली.
सध्या इस्रायली सैन्याने गाझा पट्टीमध्ये हमासच्या विरोधात ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स सुरू केले आहे. इस्रायलचे अध्यक्ष बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, देश 'युद्धात आहे'
या युद्धात आतापर्यंत एक हजार पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धामूळे अमेरिकेच्याही चिंता वाढवल्या आहेत.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ सध्याचा नसून पाचा महिन्यांपूर्वीचा आहे. गाझावरील इस्रायलच्या हल्ल्याचा हा व्हिडिओ नाही. भ्रमक दाव्यासह जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:इस्रायलने गाझा शहरावर केलेल्या हल्ल्याचा जुना व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य
Written By: Sagar Rawate
Result: Missing Context