Fact Check : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबतची पोस्ट किती खरी?

False राजकीय सामाजिक

भाई कुणाल नावाच्या एका व्यक्तीने माहितीच्या अधिकारातंर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या प्रमाणपत्रांच्या आधारे संविधान निर्माते म्हटले जाते याबाबत माहिती मागवली होती. भारत सरकारने उत्तर दिले की त्यांच्याकडे याबाबत दस्तावेज नाही. त्यामुळे आता आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान निर्माते म्हणणार नाही. भाई कुणाल यांचे अभिनंदन अशी पोस्ट हेमराज मराठे यांनी अभिनंदन भाई कुणाल असे म्हणत फेसबुकवर शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुक / Archive 

तथ्य पडताळणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत भारत सरकार नेमके काय म्हणते हे जाणून घेण्यासाठी आम्ही शोध घेतला. आम्ही भारत सरकारच्या विधी आणि न्याय विभागाच्या (मंत्रालयाच्या) संकेतस्थळावर गेलो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल येथे दिलेल्या माहितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख  principal architect of Indian Constitution असा केलेला दिसून आला. याचा भारतीय घटनेचे मुख्य शिल्पकार असा स्वैर अनुवाद मराठीत होऊ शकतो. आपण ही बाब खाली पाहू शकता. याचाच अर्थ ही भारतीय सरकारची अधिकृत भूमिका असल्याचे आपण म्हणू शकतो. 

भारत सरकारच्या विधी आणि न्याय विभागाचे संकेतस्थळ / Archive

भारत सरकारच्याच drambedkarwritings.gov.in या संकेतस्थळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख principal architect of Indian the   Constitution of india असा केलेला आहे. हे आपण खाली पाहू शकता.

drambedkarwritings.gov.in / Archive

भारत सरकारच्याच pmindia.gov.in या संकेतस्थळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आपल्याला जीवनात आलेल्या कटू प्रसंगांचे प्रतिबिंब संविधानात उमटू दिले नाही, असे म्हटले आहे. याचाच अर्थ  संविधान निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका खुद्द भारतीय पंतप्रधानांनी पब्लिक डोमेनमध्ये म्हणजेच सार्वजिनकरित्या मान्य केली आहे. आपण या ट्विटचा व्हिडिओ खालू पाहू शकता. 

आकाशवाणीच्या संकेतस्थळावरही बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख भारतीय घटनेचे शिल्पकार असाच आढळून येतो. ambedkarfoundation.nic.in या संकेतस्थळावरही आपण chief architect of our Constitution असा उल्लेख असल्याचे आपण पाहू शकता.

profile-Drambedkar

Archive

या पोस्टमध्ये भाई कुणाल म्हणून देण्यात आलेल्या व्यक्तीचा फोटोही आम्ही रिव्हर्स सर्च करुन पाहिला पण आम्हाला अपेक्षित परिणाम मिळाला नाही. गुगलवरही भाई कुणाल असे शोधल्यावर अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत. त्यामुळे या पोस्टमध्ये देण्यात आलेली माहिती असत्य असल्याचे दिसून येते.

निष्कर्ष

भाई कुणाल नावाच्या एका व्यक्तीने माहितीच्या अधिकारातंर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या प्रमाणपत्रांच्या आधारे संविधान निर्माते म्हटले जाते याबाबत माहिती मागवली होती, असे कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे भारत सरकारने याचे उत्तर दिल्याचेही दिसून येत नाही. भारत सरकारच्या संकेतस्थळांवर उपलब्ध असलेल्या माहितीत स्पष्टपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख भारतीय घटनेचे मुख्य शिल्पकार असा स्पष्टपणे केलेला दिसून येतो. सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी खोटी माहिती पसरविण्यात येत असल्याने फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य असल्याचे सिध्द होत आहे.

Avatar

Title:Fact Check : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबतची पोस्ट किती खरी?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False