योगी आदित्यनाथ, श्री श्री रविशंकर यांच्यासोबतच्या फोटोमध्ये शेफाली वैद्य आहे का?

False सामाजिक

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्या पोस्टमध्ये उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आर्ट ऑफ लिव्हिंगचे मुख्य श्री श्री रविशंकर आणि एक महिला सगळे सोबत उभे आहेत असा फोटो आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून सत्य पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट सतिशचंद्र गाडे या व्यक्तीच्या फेसबुक अकाउंटवरुन व्हायरल झालेली आहे.

फेसबुक

अर्काईव्ह  

सत्य पडताळणी

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये दोन फोटो देण्यात आले आहेत. एक फोटो ज्यामध्ये उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आर्ट ऑफ लिव्हिंगचे अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर, आणि त्यांच्यासोबत एक महिला आहेत. तर दुसरा फोटो हा ओह माय गॉड या चित्रपटातील कलाकारांचा आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोतील महिला नेमकी कोण? हे शोधण्यासाठी आम्ही सर्वात प्रथम त्या फोटोला गुगलवर रिव्हर्स इमेज केले. त्यानंतर असे समोर आले की, व्हायरल होणारा फोटो आणि मुळ फोटो यामध्ये फरक आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, श्री श्री रविशंकर आणि स्वराज्य मासिकासाठी कॉलम लिहिणाऱ्या शेफाली वैद्य हे सर्व सोबत असून, त्यांचा फोटो ओह माय गॉड या चित्रपटातील फोटोसोबत तुलनात्मकरित्या सादर करण्यात आलेला आहे. परंतू व्हायरल होणारा फोटो हा सर्वप्रथम जिग्नेश मेवानी यांच्या ट्विटर अकाउंटवरुन 29 मे 2018 ला अपलोड करण्यात आलेला आहे. जिग्नेश मेवानी यांनी व्हायरल होणाऱ्या फोटोसंदर्भातील ट्विट डिलीट केले आहे. या फोटोसंदर्भात वेबकुफ या वेबसाईटने देखील फॅक्टचेक केलेले आहे.

सौजन्य :  वेबकुफ

सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो हा ट्विटरवर थॉमस शेल्बे या व्यक्तीच्या ट्विटर अकाउंटवरुनही व्हायरल झालेला आहे.

व्हायरल होणारा फोटो हा फोटोशॉप करण्यात आलेला हे त्या फोटोला बारकाईने बघितल्यावर आढळून येते. मुळ फोटो हा 07 मार्च 2018 रोजीचा असून, आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर हे तीन दिवसीय उत्तर प्रदेश यात्रा दौऱ्यावर गेले असतानाचा आहे. श्री श्री रविशंकर उत्तर प्रदेश दौरा याबद्दल आपण  वन इंडिया या वेबसाइटवर सविस्तर बातमी वाजू शकता.

वन इंडियाअर्काइव्ह

  • श्री श्री रविशंकर आणि योगी आदित्यनाथ यांच्या मागे उभी असणारी व्यक्ती दोनवेळा दिसत आहे.
  • योगी आदित्यनाथ यांच्या डाव्या बाजूला उभी असणारी व्यक्ती ही पुन्हा शेफाली वैद्य यांच्या मागे उभी असताना दिसत आहे.
  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हे शेफाली वैद्य यांच्या बाजूला पुन्हा उभे आहेत असा भास या फोटोतून होत आहे.

या संपुर्ण प्रकरणानंतर जिग्नेश मेवानी यांनी 30 मे 2019 रोजी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन अशा प्रकारचा फोटोशॉप करण्यात आलेला फोटो व्हायरल झाल्याबद्दल सार्वजनिकरित्या माफी देखील मागितली आहे. म्हणजेच आपल्या ट्विटर अकाउंटवरुन जिग्नेश यांनीच स्वतः सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो फोटोशॉप करण्यात आलेला आहे हे स्पष्टपणे कबूल केलेले आहे.

ट्विटरअर्काईव्ह

सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो हा मुळ फोटो नसून फोटोशॉप करण्यात आलेला फोटो आहे. मुळ फोटोमध्ये केवळ उत्तर प्रदेश मुख्यमंत्री आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर हे दोघेच आहेत.

निष्कर्ष :  सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर आणि एक महिला हा फोटो असत्य आहे. या फोटोमध्ये योगी आणि रविशंकर यांच्यासोबत बाजूला उभी राहण्यात आलेली महिला फोटोशॉप करुन दाखविण्यात आली आहे.  

Avatar

Title:योगी आदित्यनाथ, श्री श्री रविशंकर यांच्यासोबतच्या फोटोमध्ये शेफाली वैद्य आहे का?

Fact Check By: Amruta Kale 

Result: False