एक हजाराची ही नवी नोट बाजारात येत आहे का? वाचा सत्य

False अर्थव्यवस्था राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

रिझर्व्ह बँकेने एक हजाराची नवी नोट बाजारात आणली आहे म्हणून सध्या समाजमाध्यमात दोन छायाचित्रे पसरत आहेत. हा या नोटेचा पुढील आणि मागील भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. परखड संतोषदादा समर्थ आणि रामभरोस चव्हाण यांनीही ही छायाचित्रे पोस्ट केली आहेत. रिझर्व्ह बँकेने खरोखरच एक हजाराची नवी नोट बाजारात आणली आहे का? आणली असल्यास त्या नोटेचीच ही छायाचित्रे आहेत का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. 

one thousand Rupees Claim.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी

रिझर्व्ह बँकेने एक हजाराची नवी नोट चलनात आणली आहे का, हे जाणून घेण्यासाठी  सर्वप्रथम आम्ही रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळास भेट दिली. या ठिकाणी एक हजारच्या नव्या नोटेविषयी कोणतीही माहिती आम्हाला दिसून आली नाही. त्यानंतर आम्ही समाजमाध्यमात व्हायरल झालेली ही नोट नीट पाहिली. त्यावेळी त्यावर “Artistic Imagination” म्हणजेच “कलात्मक कल्पना” असे लिहिले असल्याचे दिसून आले. याव्यतिरिक्त या नोटेवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर ऐवजी एम. के. गांधी अशी स्वाक्षरी दिसून येते. नोट 2020 मध्ये चलनात येत असताना त्यावर YEAR 2017 INDIA असे नमूद केले असल्याचेही दिसून येते. 

one thousand Rupees Fake note.png

यावरुन हे स्पष्ट झाले की, ही नोट म्हणजे एक कलात्मक रचना आहे. त्यावेळी रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष शक्तिकांत दास यांनी 2017 मध्ये केलेले एक ट्विटही आम्हाला दिसून आले.

Archive

निष्कर्ष 

ही नोट म्हणजे एक कलात्मक रचना आहे. मागील अनेक वर्षांपासून या कलात्मक रचनेविषयी असत्य माहिती समाजमाध्यमात पसरत आहे. रिझर्व्ह बँकेनेही याबाबत खुलासा केलेला आहे.

Avatar

Title:एक हजाराची ही नवी नोट बाजारात येत आहे का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply