प्रकाश आंबेडकर मराठा महासंघ आणि संभाजी ब्रिगेडला अपशब्द बोलले का? : सत्य पडताळणी

False राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Z:\Amruta\Post-No-9-amruta-mam.png

सोशल मीडियावर 2019 लोकसभा निवडणूकीच्या दृष्टिकोनातून सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोच्यावर बहुजनवादी मराठ्यांनी नक्कीच वाचा, असे लिहिले आहे. विशेष म्हणजे जे यांना आपले समजतात त्याच संघटनांविषयी असे वक्तव्य…!, असे म्हटले आहे. घ्या आणखी डोक्यावर अशा वंचितांना… ज्यांना बोलण्याची पद्धत नाही. प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भातील ही पोस्ट आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून सत्य पडताळणी होईपर्यंत फेसबुकवरील कांचन पाटील वडगावकर यांच्या अकाउंटवरुन हा फोटो 21 वेळा शेअर करण्यात आला आहे. या पोस्टला 229 लाईक्स आहेत आणि 70 कमेंटस् आहेत.

सत्य पडताळणी

फेसबुक

अर्काईव्ह

फेसबुकवर ब्रिगेडचा नाश एक हिंदू संघटन या पेजवरही ही पोस्ट व्हायरल होत आहे.

अर्काईव्ह

व्हायरल होणाऱ्या पोस्ट संदर्भात गुगलवर रिव्हर्स सर्च ईमेज केल्यानंतर तो फोटो सापडला. मुळात हा फोटो आणि त्या फोटोतील बातमी ही 2018 वर्षातील आहे. या इमेजवर डबल क्लिक केल्यानंतर ट्विटरवर शिवप्रतिष्ठान धारकरी या ट्विटर अकाउंटवर ही इमेज आणि या आशयाची पोस्ट 24 मार्च 2018 मधील आहे हे स्पष्ट होते.

ट्विटर

अर्काईव्ह

व्हायरल होणाऱ्या फोटो आणि बातमी संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः आपण कोणत्याही प्रकारचे अपशब्द मराठा महासंघ आणि संभाजी ब्रिगेडसाठी काढलेले नाहीत असे स्पष्ट केले आहे. या विषयावर प्रकाश आंबेडकरांचा व्हिडिओ युट्यूबवर पंचफूला प्रकाशन या चॅनलवर 24 मार्च 2018 रोजी अपलोड करण्यात आला आहे.

तसेच या व्हिडिओत या संपुर्ण प्रकरणाबाबत स्पष्टीकरण आहे. खाली याबाबत लिहिलेली एक पोस्टही आपल्याला दिसेल.

खाली दिलेल्या लिंकवर युट्यूबवर उपलब्ध असलेला प्रकाश आंबेडकरांचा व्हिडिओ आपण पाहू शकता.

संपुर्ण व्हायरल होणाऱ्या फोटो आणि संबंधित लिखाणासंदर्भात संशोधनाअंती असे आढळून आले आहे की, सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट ही मार्च 2018 या वर्षातील आहे. 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जाणीवपुर्वक लोकांना भ्रमित करण्याच्या उद्देशाने अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल करण्यात येत आहेत. वर्तमान परिस्थितीत मराठा महासंघ आणि संभाजी ब्रिगेड या दोन्हीही संघटनांविषयी प्रकाश आंबेडकर यांनी भूतकाळातही आणि वर्तमानकाळातही कोणत्याही प्रकारचे अपशब्द काढलेले नाहीत.

निष्कर्ष :  सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील फोटोमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी मराठा महासंघ आणि संभाजी ब्रिगेड यांच्यासाठी अपशब्द बोलले आहे असे म्हटले आहे. मुळात व्हायरल होणारा फोटो हा मार्च 2018 मधील असून, फोटोमध्ये नमूद केलेला मजकूर त्यांनी कधीच बोललेला नाही. याबद्दल स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे खुलासा दिलेला आहे. त्यामुळे 2019 लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या जुन्या पोस्ट व्हायरल करण्यात येत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा महासंघ आणि संभाजी ब्रिगेड यांना अपशब्द बोलल्याचे तथ्य खोटे आहे.

Avatar

Title:प्रकाश आंबेडकर मराठा महासंघ आणि संभाजी ब्रिगेडला अपशब्द बोलले का? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •