Fact : अम्रृता फडणवीस यांनी कॅलिफोर्नियात पुरग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यक्रम घेतलेला नाही

False राजकीय | Political सामाजिक

महाराष्ट्राच्या हाय प्रोफाइल लेडी अम्रुता फडणवीस कँलीफोर्निया येथे पूरग्रस्तांना मदती साठी रँम्प करताना… …..हे भाग्य फक्त मराठी माणसालाच, अशी माहिती Mohan Kawade यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी 

अमृता फडणवीस यांनी कॅलिफोर्नियात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खरोखरच काही कार्यक्रम घेतला का, ही जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वप्रथम अमृता फडणवीस यांचा कॅलिफोर्नियात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यक्रम असा शब्दप्रयोग करत शोध घेतला. त्यावेळी आम्हाला लोकसत्ता या दैनिकाच्या संकेतस्थळावरील 9 जून 2019 चे एक वृत्त दिसून आले. या वृत्तात अमृता फडणवीस यांनी नुकतीच लॉस एंजेल्सचा दौरा केल्याचे म्हटले आहे. त्यांनी चॅरिटी ट्रस्टसाठी आयोजित जय हो या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. हृदयविकार, ल्युकोमिया, लिम्फोमा अशा आजारांनी त्रस्त असलेल्या भारत आणि अमेरिकेतील रुग्णांसाठी हे कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले होते, असे या वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे. टाइम्स नाऊ मराठीनेही 7 जून 2019 रोजी याबाबतचे वृत्त दिले आहे. अमृता फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक खात्यावरवरुनही याबाबतची 7 जून रोजी माहिती दिल्याचे दिसून येते.

फेसबुक पोस्ट / Archive

अमृता फडणवीस यांच्या ट्विटर खात्यावरही याबाबतची माहिती देण्यात आली आहे. ती आपण खाली पाहू शकता.

या माहितीवरुन हे स्पष्ट होत आहे की, हा चॅरिटी शो पुरग्रस्तांसाठी नव्हे तर हृदयविकार, ल्युकेमिया आणि संदर्भातील आजार असलेल्या भारतातील आणि अमेरिकेतील रूग्णांच्या मदतीसाठी आयोजित करण्यात आला होता.

निष्कर्ष 

अमृता फडणवीस यांनी कॅलिफोर्नियात पुरगस्तांच्या मदतीसाठी कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन केले नव्हते अथवा त्यात सहभाग घेतला नव्हता. एका चॅरिटी शो मध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. हा शो हृदयविकार, ल्युकेमिया आणि संदर्भातील आजार असलेल्या भारतातील आणि अमेरिकेतील रूग्णांच्या मदतीसाठी आयोजित करण्यात आला होता.

Avatar

Title:Fact : अम्रृता फडणवीस यांनी कॅलिफोर्नियात पुरग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यक्रम घेतलेला नाही

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False