अयोध्या येथील दीपोत्सवाचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अयोध्येतील दीपोत्सवाचा आहे का, तो कोणत्या शहरातील आहे, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

काय आहे दावा?

अयोध्या शहरातील दीपोत्सवाचा हा व्हिडिओ आहे.

Facebook | Archive

तथ्य पडताळणी

अयोध्या येथील दीपोत्सवाचा हा व्हिडिओ आहे का, याचा शोध घेतला. त्यावेळी 14 एप्रिल 2020 रोजी हा व्हिडिओ युटुयुबवर अपलोड करण्यात आल्याचे दिसून आले. या व्हिडिओसोबत देण्यात आलेल्या माहितीत रामनवमी उत्सव, लेझर लाईट शो 2019 जय श्रीराम असे म्हटलेले आहे. या व्हिडिओखाली हा व्हिडिओ कुठला आहे, याची विचारणा करण्यात आली आहे. त्याला उत्तर देताना या युटुयुब वाहिनीने तो शहादा येथील असल्याचे म्हटले आहे.           

https://youtu.be/BRLyhhlbQiI

Archive

त्यानंतर शाहू राजे मराठी बातम्या या स्थानिक युटुयुब वाहिनीने 16 एप्रिल 2019 रोजी शहादा शहरात रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेचा हा व्हिडिओ असल्याचे म्हटले आहे.

https://www.youtube.com/watch?v=xaQ3JXn8OAk

Archive

यातून हे स्पष्ट झाले की, हा व्हिडिओ 2020 मधील दिवाळीतील अयोध्या येथील दीपोत्सवाचा नाही.

निष्कर्ष

अयोध्या येथील 2020 मधील दीपोत्सवाचा हा व्हिडिओ असल्याचा दावा असत्य आहे. शहादा शहरातील 2019 मधील रामनवमीचा हा व्हिडिओ आहे.

Avatar

Title:अयोध्या येथील दीपोत्सवाचा म्हणून शहाद्यातील ‘लेझर शो’चा व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse

Result: False