
अत्यंत गरीब परिस्थितीत भारतीय प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत तिसरा क्रमांक प्राप्त करणारी रेवती म्हणून सध्या समाजमाध्यमात एका मुलीचे आपल्या आई-वडिलांसोबतचे छायाचित्र व्हायरल होत आहे. या मुलीने भारतीय प्रशासकीय सेवेत खरोखरच तिसरा क्रमांक मिळवला आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

तथ्य पडताळणी
भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होण्यासाठी परीक्षा घेणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळास सर्वप्रथम भेट दिली. याठिकाणी उपलब्ध असलेले निकाल पाहिले असता या युवतीचे नाव या निकालात दिसून आले नाहीत. त्यामुळे शोध घेतला असता journalismpower.com या संकेतस्थळावर 26 मार्च 2017 रोजी तेलगू भाषेत प्रसिध्द झालेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार रेवती ही आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील अवनीगड्डा येथील एका गरीब कुटूंबातील मुलगी आहे. रेवतीची आंध्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेली आहे. तेलगू संकेतस्थळाने दिलेले हे वृत्त आणि छायाचित्र आपण खाली पाहू शकता.

याव्यतिरिक्त आंध्र प्रदेशातील सर्वाधिक खपाच्या इनाडू या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर निवड झालेल्या पोलीस उपनिरीक्षकांची यादी प्रसिध्द झाली होती या यादीत रेवती यांचे नाव आपण खाली पाहू शकता.

याव्यतिरिक्त आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील अवनीगड्डा येथील शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ पोलीस येथे 28 मार्च 2017 रोजी रेवतीचा सत्कार समारंभ झाला होता. ते देखील आपण पाहू (संग्रहित) शकता. नमस्ते तेलंगणाने याबाबतचे 28 मार्च 2017 रोजी दिलेले वृत्तही आपण पाहू शकता.
निष्कर्ष
यातून हे स्पष्ट झाले की, रेवती व्यंकटा मथी हिची निवड आंध्र प्रदेश पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून 2017 मध्ये झाली आहे. ती कर्नाटकातील असून भारतीय प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत तिसरी आली असल्याचे असत्य आहे.

Title:ही युवती भारतीय प्रशासकीय सेवेतील टॉपर नाही, वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
