जखमी पोलिसांचे कुटुंबीय आंदोलन करणार का? वाचा सत्य

दिशाभूल करणाऱ्या I Misleading सामाजिक

दिल्लीमध्ये 26 जानेवारी रोजी झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. त्यादरम्यान अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले. या पार्श्वभूवीवर सोशल मीडियावर दावा करण्यात येत आहे की, जखमी झालेल्या पोलिसांचे कुटुंबीय याविरोधात आंदोलन करणार आहेत. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. 

काय आहे दावा? 

सोशल मीडियावर जखमी पोलिसांचे कुटुंबीय आंदोलन करणार असा मेसेज पसरवला जात आहे. त्यात म्हटले की, “कोणीही आपल्या भावाला, नवऱ्याला किंवा मुलाला मरण्यासाठी नाही पाठवत. या घटनेविरोधात त्यांचे कुटुंबीय आंदोलन करणार.”

फेसबुकआर्काइव्ह 

तथ्य पडताळणी 

शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय आंदोलन करणार आहे का याचा शोध घेतला. मात्र अशी कोणतीही बातमी इंटरनेटवर प्रकाशीत झालेली आढळली नाही. 

त्यानंतर दिल्लीचे पोलिस सहआयुक्त जसपाल सिंह यांच्या फॅक्ट क्रेसेंडोने (हिंदी) संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले की, “जर पोलिसांच्या कुटुंबियांना लाल किल्याजवळ झालेल्या हिंसाचाराविरोधात आंदोलन करायचे असेल तर, तो त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे.” मात्र त्यांना या आंदोलनाविषयी कोणतीही माहिती नव्हती. 

यानंतर दिल्लीचे आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी व्हायरल दावा फेटाळत सांगितले की, “पोलिसांचे कुटुंबीय अशा प्रकारचे कोणतेही आंदोलन करणार नाहीत.”

निष्कर्ष 

यावरून स्पष्ट होते की, पोलिसांचे कुटुंबीय लाल किल्ल्याजवळ झालेल्या हिंसेविरोधात कोणतेही आंदोलन करणार नाहीत. सोशल मीडियावर चुकीचा मेसेज व्हायरल होत आहे.

Avatar

Title:जखमी पोलिसांचे कुटुंबीय आंदोलन करणार का? वाचा सत्य

Fact Check By: Milina Patil 

Result: Misleading