तथ्य पडताळणी : अरुण जेटली यांच्या प्रकृतीबद्दलच्या बातम्यांचे सत्य काय

False राजकीय राष्ट्रीय

( फोटो सौजन्य : businessworld.in)

अरुण जेटली यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन असे वृत्त सोशल मीडियावर सध्या पसरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने त्याची तथ्य पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

अरुण जेटली यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे का? याचा शोध घेण्यासाठी आम्ही भारत सरकारच्या पत्र सुचना कार्यालयाचे महासंचालक सीतांशू कर यांच्या ट्विटर अकाऊंटला भेट दिली. त्यांनी या ठिकाणी हे वृत्त चुकीचे असल्याचे ट्विट केले आहे. हे ट्विट तुम्ही खाली पाहू शकता. “मीडियामध्ये केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांची प्रकृती अस्वस्थ असल्याच्या ज्या बातम्या फिरत आहेत, त्या पुर्णपणे चुकिच्या आणि तथ्यहीन आहेत. मीडियाने अशा अफवांपासून दूर राहावे”, असं ट्वीट सितांशू कर यांनी केलं आहे.

खासदार स्वपन दासगुप्ता यांच्या ट्विटर अकाऊंटला भेट दिली. याठिकाणी त्यांनी अरुण जेटली यांच्यासोबत काही तासांपूर्वीच काढलेले एक छायाचित्र दिसून येते.

ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा यांनीही या वृत्ताचे आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन खंडन केले आहे. “माझे मित्र अरुण जेटली यांच्या प्रकृतीबाबत सर्वजण चर्चा करत आहेत. काही जणांना खरंच काळजी आहे, तर काही जण विचित्र गोष्टी बोलत आहेत. मी शनिवारी (25 मे) सायंकाळी त्यांना भेटलो. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पण, सध्या त्यांच्या मित्रांनी आणि जवळच्यांनी त्यांना लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे”, असं ट्वीट रजत शर्मा यांनी केले आहे..

टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीनेही याबाबतचे वृत्त दिले आहे. आपण हे वृत्त खाली वाचू शकता.

अक्राईव्ह

निष्कर्ष

अरुण जेटली यांच्या प्रकृतीबाबत वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत. सरकारने त्याविषयी खुलासा केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हे वृत्त असत्य असल्याचे सिध्द झाले आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणी : अरुण जेटली यांच्या प्रकृतीबद्दलच्या बातम्यांचे सत्य काय

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False