सत्य पडताळणी : हार्दिक पटेल, कन्हैय्या, चंद्रशेखर आझाद काँग्रेसचे उमेदवार आहेत का?

False राजकीय

हार्दिक पटेल, कन्हैय्या, चंद्रशेखर रावण काँग्रेसचे उमेदवार  असल्याचा दावा फॉर बीजेपी महाराष्ट्र या पेजवरील एका पोस्टमध्ये करण्यात आला आहे. हार्दिक पटेल, कन्हैय्या, चंद्रशेखर आझाद हे खरेच काँग्रेसचे उमेदवार आहेत का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी  

बेळगाव तरुण भारतने ही पोस्ट प्रसिध्द झाल्यानंतर जवळपास 5 दिवसांनी एक वृत्त प्रसिध्द केले आहे. या वृत्तात जामनगरमधून निवडणूक लढवण्यासाठी हार्दिक पटेल इच्छुक आहेत. पण काँग्रेसने अजून त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. असे स्पष्ट म्हटलेले आहे. फॉर बीजेपी महाराष्ट्र या पेजवरील पोस्टवर मात्र थेट हार्दिक पटेलला काँग्रेसचे तिकीट मिळाल्याचे म्हटले आहे.

आक्राईव्ह लिंक

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेली उमेदवाराची यादी पाहिल्यासही हार्दिक पटेलचे नाव कुठेही दिसून येत नाही.

काँग्रेसच्या उमेदवारांची यादी

आक्राईव्ह लिंक

कन्हैय्याकुमार याला काँग्रेसचे तिकीट मिळाल्याचा दावाही फॉर बीजेपी महाराष्ट्रच्या पेजवरील पोस्टमध्ये करण्यात आला आहे. कन्हैय्या कुमारला सीपीआयने उमेदवारीचे तिकीट दिल्याचे वृत्त द हिंदू या दैनिकाने 24 मार्च 2019 रोजी दिले आहे.

आक्राईव्ह लिंक

सीपीआयने आपल्या पाचव्या यादीत कन्हैय्या कुमार याला तिकीट दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कन्हैय्या कुमार हा काँग्रेसचा उमेदवार नसल्याचेही स्पष्ट होत आहे.

आक्राईव्ह लिंक

स्क्रोल डॉट इन या संकेतस्थळाने दिनांक 15 मार्च 2019 रोजी दिलेल्या एका वृत्तानुसार भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद हे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी वाराणसीतून निवडणूक लढविल्यास त्यांच्याविरोधात निवडणूक लढविणार आहेत. हुकार रॅलीत बोलताना त्यांनी काँग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे म्हटले आहे. या वृत्तात कुठेही त्यांना काँग्रेसचे तिकीट मिळाल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे फॉर बीजेपी महाराष्ट्रच्या पेजवरील पोस्टमध्ये करण्यात आलेला त्यांना काँग्रेसचे तिकीट मिळाल्याचा दावा चुकीचा आहे. त्यांची प्रियांका गांधी यांनी भेट घेतल्याचा उल्लेख मात्र या वृत्तात आहे.

आक्राईव्ह लिंक

दैनिक लोकसत्तानेही चंद्रशेखर आझाद हे मोदींविरोधात निवडणूक लढविणार असल्याचे वृत्त दिले आहे. या वृत्तातही कुठेही ते काँग्रेसकडून निवडणूक लढविणार असल्याचे म्हटलेले नाही.

आक्राईव्ह लिंक

निष्कर्ष

हार्दिक पटेल, कन्हैय्या, चंद्रशेखर आझाद यापैकी कुणालाही काँग्रेसने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. विविध दैनिकातून आलेल्या वृत्तातुन आणि या पक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावरुनही हे स्पष्ट होते. त्यामुळे पोस्टमध्ये करण्यात आलेला या तिघांना काँग्रेसने उमेदवारी दिल्याचा दावा असत्य आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : हार्दिक पटेल, कन्हैय्या, चंद्रशेखर आझाद काँग्रेसचे उमेदवार आहेत का?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False