Fact check : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमधील आजीला घराबाहेर काढण्यात आले होते का?

False सामाजिक

आज ते वृध्द आहेत, उद्या तुम्ही वृध्द व्हाल. आज जे त्यांचे वर्तमान आहे तेच तुमचे उद्या असणार आहे. जेव्हा शरीर साथ सोडू लागेल, तुम्हाला अस्पष्ट दिसू लागेल तेव्हा तुम्हाला तुमच्या घरातून उचलून बाहेर फेकून दिले जाईल. तेव्हा तुमच्या डोळ्यावर असलेली पट्टी नक्की उघडेल. तेव्हा तुम्ही म्हणाल, माझ्या घरच्यांनी माझ्यासोबत असे का केले, अशी पोस्ट एका छायाचित्रासोबत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टमधील तथ्यांची पडताळणी केली आहे.

Archive

तथ्य पडताळणी

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या हा फोटो नेमका कुणाचा आहे आणि यामागील सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही हा फोटो गुगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे शोधला. त्यावेळी आम्हाला याचे खालील सत्य दिसून आले.

Archive

न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार या छायाचित्राबाबत सांगण्यात येणारी गोष्ट मुळात खरी नाही. ती चुकीची सांगण्यात येत आहे.

हा फोटो 2007 मध्ये बीबीसी गुजरातीचे वरिष्ठ छायाचित्रकार कल्पेश बऱ्हेच यांनी घेतलेला आहे. ते एका शाळेच्या सहलीचे वृत्तांकन करण्यासाठी गेले होते. बीबीसी गुजरातीने याबाबत दिलेले वृत्त तुम्ही खाली पाहू शकता.

 For Full story click on BBC Gujrati link-Story

गुजराती भाषिक दैनिक दिव्य भास्करने हे छायाचित्र पहिल्या पानावर प्रकाशित केले होते. त्यानंतर आपली समाजव्यवस्था, कुटूंबव्यवस्था आणि त्यातील ज्येष्ठांची सध्यस्थिती हा पूर्ण गुजरातमध्ये चर्चेचा विषय झाला होता.

बीबीसी हिंदीने याबाबत वेगवेगळी आणि खोटी माहिती प्रसारित होऊ लागल्यानंतर या आजीची आणि तिच्या नातीची मुलाखत घेतली. ही मुलाखत आपण खाली पाहू शकता. आजी वृध्दाश्रमात आपल्या मर्जीने राहत होती. माझा संवेदनशील स्वभाव लक्षात घेऊन घरच्यांनी मला आजी बाहेरगावी गेल्याचे सांगितले होते. आजी मला अचानक भेटल्यावर मला रडायला आले. त्यावेळी हा फोटो घेतला असल्याचे या नातीने या मुलाखतीत सांगितले. आपल्याला घराबाहेर काढले नव्हते. आपण घरी येत असल्याचे आणि आपण शांततेसाठी, समाधान तिथे आपल्या मर्जीने राहत असल्याचे आजींनी सांगितले आहे.

निष्कर्ष

हा फोटो 2007 मध्ये बीबीसी गुजरातीचे तत्कालिन वरिष्ठ छायाचित्रकार कल्पेश बऱ्हेच यांनी घेतलेला आहे. आपल्याला मुलाने घराबाहेर काढले ही या फोटोबाबत पसरविण्यात येणारी माहिती चुकीचे असल्याचे या आजींचे आणि तिच्या नातीचे म्हणणे आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact check : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमधील आजीला घराबाहेर काढण्यात आले होते का?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False