Fact check : रेल्वेचे खासगीकरण होणार का?

False सामाजिक

मोदी सरकार #रेल्वेचं_खासगीकरण करण्याच्या #मार्गावर ! स्पेशल रिपोर्ट-TV9
रेल्वे खासगीकरण झाल्यास तिकीट दरवाढ होणार….आणि रेल्वे मधील नोकरी भरती चे बारा वाजणार…आता भारतात येणार रेल्वे आणि सामान्य जनतेला अच्छे दिन….अशी एक पोस्ट Gaurav Matte यांनी शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुक / Archive 

तथ्य पडताळणी

रेल्वेचे खासगीकरण होणार का? याची माहिती घेण्यासाठी आम्ही रेल्वेचे खासगीकरण होणार का? असे गुगलवर सर्च केले. त्यावेळी आम्हाला दैनिक लोकमतचे खालील वृत्त दिसून आले. या वृत्तात शताब्दी आणि राजधानी या ट्रेनचे खासगीकरण होणार असल्याचे म्हटले आहे. लोकमतने हे वृत्त 7 जून 2019 रोजी प्रसिध्द केलेले आहे. 

लोकमत / Archive

महाराष्ट्र टाईम्सने रेल्वे खासगीकरणाकडे?, पीपीपी मॉडेल राबवणार असे वृत्त 5 जुलै 2019 रोजी प्रसिध्द केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रेल्वेच्या विकासासाठी 50 लाख कोटींची आवश्यकता आहे. त्यामुळे रेल्वेत पीपीपी (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीप) मॉडल राबविण्यात येणार असल्याचे म्हटल्याचे या वृत्तात म्हटले आहे. द वायर मराठीनेही रेल्वे रूळ बांधण्यासाठी पीपीपी मॉडेलला मंजुरी देण्यात आल्याचे आणि मेट्रो रेल्वे प्रकल्पांसाठी पीपीपी मॉडेल राबवणार असल्याचे वृत्त दिले आहे. साम टीव्हीने मोदी सरकारने रेल्वेच्या खासगी करणार घाट घातला आहे, असे आपल्या वृत्तात म्हटले आहे. देबरॉय समितीने खासगीकरणाची शिफारस केल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.

तपासादरम्यानच आम्हाला नवराष्ट्र डॉट कॉमने 29 जून 2019 रोजी दिलेले वृत्त दिसून आले. या वृत्तात रेल्वेचे किंवा राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेस यांसारख्या महत्त्वाच्या गाडय़ांचे खासगीकरण करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केल्याचे म्हटले आहे. 

नवराष्ट्र डॉट कॉम / Archive 

दैनिक लोकसत्तानेही पीटीआय या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. खासगीकरण आणि संपूर्ण रेल्वे यांचे खासगीकरण करण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना गोयल यांनी राज्यसभेत लेखी उत्तर दिल्याचे या वृत्तात म्हटले आहे. 

दैनिक लोकसत्ता / Archive

निष्कर्ष

रेल्वे खासगीकरणाच्या मार्गावर असल्याचे आणि रेल्वेचे खासगीकरण करण्यात येणार असल्याचे वृत्त वेगवेगळ्या माध्यमांनी दिल्याचे दिसून येते. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे. राज्यसभेत लेखी स्वरुपात रेल्वेचे खासगीकरण करण्यात येणार नसल्याचे उत्तर त्यांनी दिले आहे.  त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact check : रेल्वेचे खासगीकरण होणार का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False