चीनमधील विद्यार्थ्याने तयार केलेल्या शॉर्टफिल्मला इजिप्तच्या दिग्दर्शकाच्या नावे केले जात आहे शेयर. वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

स्मार्टफोनच्या आहारी गेल्यामुळे आपण न केवळ आपसातील संवाद विसरलो आहोत तर, आसपासच्या जगाचाही आपल्याला विसर पडला आहे. मोबाईलच्या स्क्रीनमध्ये डोक खुपसून आपण आपले आयुष्य जगत आहोत. जगाचे हे भीषण वास्तव दाखवणारी एक शॉर्टफिल्म सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

“लालट्रा पार” नावाची ही तीन मिनिटांची ही क्लिप इजिप्तच्या एका 20 वर्षीय दिग्दर्शकाने तयार केली असल्याचे म्हटले जात आहे. या शॉर्टफिल्मला व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मचा पुरस्कार मिळाल्याचेही व्हायरल मेसेजमध्ये सांगितले जाते. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता हा दावा खोटा असल्याचे समोर आले. ही शॉर्टफिल्म इजिप्तच्या दिग्दर्शकाने तयार केलेली नाही. 

काय आहे दावा?

तीन मिनिटांचा एक अ‍ॅनिमेशन व्हिडियो शेयर करून सोबत मेसेजमध्ये म्हटले आहे की, इजिप्शियन चित्रपट “लल्ट्रा पार” केवळ 3 मिनिटे चालला आणि व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मचा पुरस्कार जिंकला. दिग्दर्शक 20 वर्षांचा आहे. तंत्रज्ञानात लोक स्वतःला कसे वेगळे करतात आणि मानवी सहजीवन कसे गमावतात हे या चित्रपटात वर्णन केले आहे.

युट्यूबवरदेखील याच दाव्यासह ही क्लिप शेयर केली जात आहे. 

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

मेसेजमध्ये जे ‘लल्ट्रा पार’ नाव दिले आहे ते सदरील व्हायरल क्लिपमध्ये दिसत नाही. तसेच क्लिप संपल्यावर श्रेयनामावलीदेखील नाही. त्यामुळे ही फिल्म कोणती हे शोधणे गरजेचे आहे.

त्यानुसार गुगलवर शोधले असता कळाले की, या शॉर्ट फिल्मचे नाव ‘लल्ट्रा पार’ नाही.  चीनमधील Chenglin Xie नावाच्या विद्यार्थ्याने ती 2015 साली तयार केली होती. 

Watch on YouTube

फिल्म डेटाबेस वेबसाईटन IMDB आणि 24FPS टनुसार, या शॉर्टफिल्मचे नाव Life Smartphone आहे. दिग्दर्शक Chenglin Xie हा चीनमधील Central Academy of Fine Arts संस्थेमध्ये विद्यार्थी होता. 2015 साली चीनमधील सर्वोत्कृष्ट 30 लघुचित्रकाटकारांमध्ये त्याचे नाव समाविष्ट करण्यात आले होते. विविध शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये ही शॉर्टफिल्म दाखविण्यात आल्यानंतर जगभरात ती गाजली. अनेक प्रतिष्ठित वेबसाईटने तिच्याविषयी बातम्या दिल्या होत्या.

मूळ आर्टिकल येथे वाचा – फास्ट कंपनी 

मग 20 वर्षीय इजिप्तच्या दिग्दर्शकाची कोणती फिल्म आहे?

L’altra Par या स्पॅनिश शब्दाचा अर्थ दुसरा भाग असा होता. त्यानुसार शोध घेतल्यावर कळाले की, The Other Pair (2014) नावाची एक इजिप्शियन शॉर्ट फिल् आहे. तिची दिग्दर्शका Sarah Rozik ही 20 वर्षांची होती जेव्हा तिने ही फिल्म तयार केली होती. लक्झॉर फेस्टिव्हलमध्ये तिला पुरस्कार मिळाला होती. आणि ती तीन मिनिटांची नसून, सहा मिनिटांची आहे. महात्मा गांधींच्या आयुष्यातील एका प्रसंगावर ही फिल्म आधारित आहे. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, जी शॉर्टफिल्म इजिप्तच्या दिग्दर्शाकाच्या नावे फिरवली जात आहे ती मूळात चीनमधील एका विद्यार्थ्याने तयार केली होती तिचे नाव ‘लाईफ स्मार्टफोन’ (2015) असे आहे. आणि तिला व्हेनिस फिल्म फेस्टव्हलमध्ये पुरस्कार मिळाला नव्हता.

Avatar

Title:चीनमधील विद्यार्थ्याने तयार केलेल्या शॉर्टफिल्मला इजिप्तच्या दिग्दर्शकाच्या नावे केले जात आहे शेयर. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •