कुंभमेळ्यावर टीका केली म्हणून पत्रकार प्रज्ञा मिश्राचा खून झाला का? वाचा सत्य

False राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीचे फोटो आणि खूनाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कुंभमेळा आयोजित करण्यावरून टीका करणारी पत्रकार प्रज्ञा मिश्रा हिची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, प्रज्ञा मिश्रा यांची हत्या झालेली नाही. ती निव्वळ अफवा आहे.

काय आहे दावा?

व्हायरल मेसेजमध्ये रस्त्यावर पडलेल्या मृतदेहाचे दोन फोटो आणि खूनाचा सीसीटीव्ही फुटेज शेअर करून म्हटले की, “एका तासपुर्वी हरिद्वार येथील कुंभ मेळा वर ग्राउंड रिपोर्तिंग करणाऱ्या प्रग्न्या शर्मा या पत्रकाराचा भर रस्त्यात कसा घात केला जातोय? जनतेसमोर सत्य दाखवल्यावर असा खेळ खेळला जातोय उत्तर प्रदेश मध्ये. जाहीर धिक्कार अशा सरकारचा.”

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम शोधले की, प्रज्ञा मिश्रा यांचा खरंच खून झाला का? तेव्हा प्रज्ञा मिश्रा यांनी 18 एप्रिल रोजी स्वतः केलेले ट्विट आढळले. यामध्ये त्यांनी त्यांच्या खूनाच्या बातम्या अफवा असल्याचे स्पष्ट केले. 

व्हायरल होत असलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करून त्यांनी खुलासा केला की, कोविड प्रोटोकॉलमुळे मी घरी असून एकदम सुरक्षित आहे. माझ्या खूनाची बातमी खोटी आहे.

प्रज्ञा मिश्रा जिवंत आहेत तर मग हे फोटो आणि व्हिडिओ कुठले आहेत?

शोध घेतल्यावर कळाले की, हे फोटो 10 एप्रिल 20201 रोजी दिल्ली येथे नीलू मेहता या महिलेची तिच्या पतीने हत्या केली होती. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. 

चारित्र्याच्या संशयावरून हरीश मेहता याने पत्नीचा दिवसाढवळ्या खून केला होता. दिल्लीतील रोहिनी भागात ही घटना घडली होती.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे राजकोट (गुजरात) येथील हरीश आणि निलू यांचे आठ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. निलू या संजय गांधी हॉस्पीटलमध्ये नोकरीला होत्या. त्यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचा हरीशला संशय होता. त्यातूनच त्याने हा गुन्हा केला.

मूळ बातमी – इंडिया टुडे | इंडियन एक्सप्रेस

निष्कर्ष

पत्रकार प्रज्ञा मिश्रा यांचा खून झालेला नाही. तो व्हायरल मेसेज खोटा आहे.  दिल्लीतील खूनाचे फोटो चुकीच्या माहितीसह पसरविली जात आहेत.

Avatar

Title:कुंभमेळ्यावर टीका केली म्हणून पत्रकार प्रज्ञा मिश्राचा खून झाला का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •