मुंबईतील खड्डेमय रस्त्याचा फोटो नागपुरच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

False राजकीय

एका खड्डेमय रस्त्याचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, नागपूरमधील भंडारा रोडची अशी दयनीय अवस्था झाली आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा आहे. हा फोटो नागपुरचा नाही.

काय आहे दावा?

उंचीवरून काढलेल्या या फोटोमध्ये अक्षरशः चाळणी झालेल्या रस्त्यावर मोठ्यामोठ्या खड्ड्यामध्ये पाणी साचलेले दिसते. सोबत म्हटले की, “नागपूर मनपाने पडताळणी करत हे चित्र भंडारा रोड वरील आहे असं सांगितलं.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, गेल्या अनेक वर्षांपासून हा फोटो वेगवेगळ्या शहरांच्या नावांनी व्हायरल होत आहे. 

ऑऊटलूक मॅगझीनच्या एका आर्टिकलनुसार, हा फोटो मुंबईचा आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या मुंबई आवृत्तीमध्ये 23 जुलै 2017 रोजी हा फोटो प्रसिद्ध झाला होती. बातमीनुसार, हा फोटो सायनमधील प्रतीक्षा नगरमधील आहे.

टाईम्स इंडियामध्ये 23 जुलै 2017 रोजी प्रकाशित फोटो

टाईम्स ऑफ इंडियाचे छायाचित्रकार एस. एल. शांता कुमार यांना टिपला होता. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरूनदेखील चार वर्षांपूर्वी हा फोटो शेअर केला होता.

2017 साली हा फोटो बंगळुरू शहराच्या नावाने व्हायरल झाला असता कुमार यांनी खुलासा केला होता की, “हा फोटो मुंबईतील असून, तो मी काढला आहे. टाईम्स ऑफ इंडियाकडे या फोटोचे अधिकार सुरक्षित आहे.”

एस. एल. शांता कुमार यांच्या इन्स्टाग्राम पोस्टचा स्क्रीनशॉट

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, मुंबईतील खड्डेमय रसत्याचा फोटो नागपूरच्या नावाने व्हायरल होत आहे. हा फोटो 2017 साली सायन येथे काढण्यात आला होता. चुकीच्या दाव्यासह तो व्हायरल केला जात आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:मुंबईतील खड्डेमय रस्त्याचा फोटो नागपुरच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False