सत्य पडताळणी : सकलविद्याप्रवीण सरफोजीराजे बनले जनतेसाठी डॉक्टर

True वैद्यकीय

*१७ शतकातला एक मराठा राजा जो हवालदिल रूग्णांसाठी स्वतःच बनला “डॉक्टर”* अशी एक पोस्ट The Great Maratha-श्रीमंत महादजी शिंदे सरकार या पेजवरुन सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

सरफोजी महाराज कोण होते?  याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला विकीपीडियावर खालील माहिती आढळून आली.

आक्राईव्ह लिंक

दैनिक लोकसत्ताने 20 ऑगस्ट 2017 रोजी सरफोजी राजांबद्दल एक लेख लिहिलेला आहे. या लेखात शिवाजीराजांचे सावत्रबंधू व्यंकोजीराजे यांनी कावेरीच्या खोऱ्यात तंजावरी मराठी राज्य स्थापन केल्याचे म्हटले आहे.  इ. स. १८५६ पर्यंत- म्हणजे सुमारे १७५ वर्षे तंजावरचे राज्य अस्तित्व राखून होते, असे या लेखात नमूद करण्यात आले आहे. तंजावरमध्ये मराठी संस्कृतीचा प्रवाह  वाहता ठेवण्याचे श्रेय तंजावरच्या या राज्यकर्त्यांनी केल्याचे या लेखात म्हटले आहे.

आक्राईव्ह लिंक

सरफोजी राजांविषयी contributions of thanjavur Maratha kings या पुस्तकात सविस्तर माहिती आहे. Raja Serfoji Ii (Pathfinders) या Savithri Preetha Nair यांनी लिहिलेल्या पुस्तकातही सरफोजी राजांविषयी माहिती उपलब्ध आहे. खाली देण्यात आलेल्या लिंकवरही सरफोजी राजांविषयी माहिती उपलब्ध आहे.

maharaja serfoji ii – Shanlax International Journals

sanatansanskruti.blogspot.com या ब्लॉगवरही सरफोजी राजांचा उल्लेख नयनरोग विशेषज्ञ असा करण्यात आला आहे. या ठिकाणी काही उपलब्ध दस्तावेजाची छायाचित्रेही दर्शविण्यात आली आहेत.

आक्राईव्ह लिंक

महाराष्ट शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून प्रसिध्द होणाऱ्या लोकराज्य या मासिकातही सरफोजी राजांचा उल्लेख उत्तम वैद्य व डोळ्यांचे डॉक्टर असा करण्यात आला आहे.

आक्राईव्ह लिंक

thefearlessindian.in या संकेतस्थळावरही सरफोजी राजांचा त्यांच्या आरोग्यविषयक कामाचा उल्लेख आढळतो.  

आक्राईव्ह लिंक

निष्कर्ष

सरफोजी राजे हे जनतेसाठी डॉक्टर बनल्याचे फॅक्ट क्रेसेंडोच्या तथ्य पडताळणीत सत्य आढळून आले आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : सकलविद्याप्रवीण सरफोजीराजे बनले जनतेसाठी डॉक्टर

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False