Fact : जगातील सर्वाधिक आनंदी लोक फिनलँडमध्ये, भारताचे स्थान 140 वे

Mixture/अर्धसत्य राजकीय सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

जगातील सर्वात आनंदी देशांमध्ये सऊदी अरब नंबर 1, पाकिस्तान नंबर 80, नेपाळ नंबर 99 आणि भारत 122 नंबरवर आहे. भक्तांनो इथे पण आपण मागे राहिलो आता बोला मोदी है तो मुमकिन है, अशी माहिती Political METRO या फेसबुक पेजवर देण्यात पोस्ट करण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुक पोस्ट / Archive

तथ्य पडताळणी  

जगातील सर्वात आनंदी देश कोणता, याची माहिती घेण्यासाठी जगातील सर्वात आनंदी देश असा शब्दप्रयोग करत शोध घेतला. त्यावेळी आम्हाला दिव्य मराठीच्या संकेतस्थळावरील खालील वृत्त दिसून आले. या वृत्तात फिनलँन्ड दुसऱ्यांदा जगातील सर्वाधिक आनंदी देश असल्याचे म्हटले आहे. भारताचे स्थान या सूचीत सात क्रमांकांनी घसरून 140 व्या स्थानावर गेले असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. 

दिव्य मराठी / Archive

त्यानंतर आम्हाला सीएनएनच्या संकेतस्थळावरील खालील वृत्त दिसून आले. या वृत्तातही फिनलँन्ड हा सलग दुसऱ्यांदा जगातील सर्वाधिक आनंदी देश ठरला असल्याचे म्हटले आहे. 

सीएनएन / Archive

जगातील सर्वाधिक आनंदी देशांचा अहवाल तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. यात सौदी अरबचा क्रमांक 28 वा असल्याचे आपण पाहू शकता. पाकिस्तानचा क्रमांक 67 वा आहे. नेपाळचा क्रमांक 100 वा आहे. भारताचा क्रमांक 140 वा आहे.  

WHR19

आनंदी देशाच्या यादी आपण मागे राहिलो ही बाब मात्र सत्य असल्याचे दिसून आले.

निष्कर्ष 

फिनलँन्ड हा जगातील सर्वाधिक आनंदी देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. सौदी अरबचा क्रमांक 28 वा आहे तर भारताचा क्रमांक 140 वा आहे. आनंदी देशाच्या यादी भारत मागे आहे, ही बाब मात्र सत्य आढळली आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट संमिश्र स्वरूपाची आढळली आहे.

Avatar

Title:Fact : जगातील सर्वाधिक आनंदी लोक फिनलँडमध्ये, भारताचे स्थान 140 वे

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •