दक्षिण आफ्रिकेतील बिबट्याचा व्हिडिओ राजस्थानमधील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

False सामाजिक

राजस्थानमधील रणथंबोर येथील हॉटेल ताजमधील बिबट्याचा म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ रणथंबोर येथील हॉटेल ताजमधील बिबट्याचा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

राजस्थानमधील रणथंबोर येथील हॉटेल ताजमधील बिबट्याचा हा व्हिडिओ आहे का, याचा शोध घेतला. त्यावेळी travelandleisure.com या संकेतस्थळावर 9 सप्टेंबर 2020 रोजी या व्हिडिओसह देण्यात आलेली माहिती दिसून आली. या माहितीनुसार हा सिंगिता एबोच्या लॉजमधील व्हिडिओ आहे.

image7.png

संग्रहित

या माहिती व्यतिरिक्त अन्य काही बातम्याही आम्हाला दिसून आल्या. 

foxnews.com | thesouthafrican.com | nypost.com

हा व्हिडिओ 6 सप्टेंबर 2020 रोजी Kruger Sightings नावाच्या युटूयूब चॅनलवरूनही प्रसारित करण्यात आला असल्याचे दिसून येते. दक्षिण आफ्रिकेतील एका हॉटेलमधील हा व्हिडिओ असल्याचे याठिकाणी स्पष्ट करण्यात आले आहे.

संग्रहित

इंग्लंडचा प्रसिद्ध क्रिकेटपटू केविन पीटरसनने त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर हा व्हिडिओ 3 सप्टेंबर 2020 रोजी अपलोड केला असल्याचेही दिसून आले.

संग्रहित

निष्कर्ष

राजस्थानमधील रणथंबोर येथील हॉटेल ताजमधील बिबट्याचा हा व्हिडिओ असल्याचा दावा असत्य आहे. दक्षिण आफ्रिकेतील एका हॉटेलमध्ये घडलेल्या घटनेचा हा व्हिडिओ आहे.

Avatar

Title:दक्षिण आफ्रिकेतील बिबट्याचा व्हिडिओ राजस्थानमधील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False