राहुल गांधी कन्नड भाषेतील वृत्तपत्र वाचत नव्हते. वाचा त्या व्हायरल फोटोचे सत्य

False राजकीय

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा वृत्तपत्र वाचतानाचा फोटो अलिकडे व्हायरल होत आहे. या फोटोद्वारे त्यांची खिल्ली उडवली जात आहे की, वर्तमानपत्र कन्नड भाषेतील असूनही राहुल गांधी ते वाचण्याचे नाटक करीत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या फोटोची पडताळणी करण्याची विनंती केली.

फॅक्ट क्रेसेंडोने शोध घेतला असता कळाले की, फोटोत राहुल गांधी नॅशनल हेराल्ड हा इंग्रजी पेपर वाचत होते.

काय आहे पोस्टमध्ये?

फोटोमध्ये राहुल गांधी व्यासपीठावर एक वर्तमानपत्र वाचत आहेत. वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर कन्नड भाषेतील मजकूर दिसतो. राहुल गांधी यांच्यावर उपहासाने टीका करीत युजरने लिहिले की, कन्नड भाषा वाचायला सोपी जाते..!!

Rahul-12.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम फोटोचे बारकाईने निरीक्षण केल्यावर दिसते की, वृत्तपत्राचे नाव NATIONAL या शब्दाने सुरू होते. हा जर कन्नड भाषेतील पेपर असेल तर त्याचे नाव इंग्लिशमधून का लिहिले जाईल? यावरून पोस्टच्या सत्यतेबाबत शंका उपस्थित होते.

गुगल रिव्हर्स इमेज आणि की-वर्ड्स सर्च केले असता कळाले की, हा फोटो नॅशनल हेराल्ड  या इंग्रजी पेपरच्या विशेष अंकाच्या प्रकाशन सोहळ्यातील आहे. बंगळुरू शहरात 12 जून 2017 रोजी हा कार्यक्रम पार पडला होता.

वन इंडियाच्या बातमीनुसार, नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राची 2008 साली बंद पडलेली बंगळुरू आवृत्ती पुन्हा सुरू करण्यापूर्वी राहुल गांधी यांच्या हस्ते या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले होते. या बातमीत राहुल गांधी यांचा सध्या व्हायरल होत असलेला फोटोदेखील आहे.

Rahul-1.png

मूळ बातमी येथे वाचा – वन इंडियाअर्काइव्ह

राहुल गांधी यांनीदेखील या अंकाची माहिती देणारे 12 जून 2017 रोजी ट्विट केले होते. एनडीटीव्ही वाहिनीने या कार्यक्रमाविषयी बातमी दिली होती.

राज्यसभा टीव्हीच्या बातमीत या कार्यक्रमातील दुसरा फोटो आढळला. यामध्ये कर्नाटकचे तत्कालिन मुख्यमंत्री के सिद्धरामय्या, राज्यपाल वजूभाई रुदाभाई वाला, राहुल गांधी आणि  हमीद अन्सारी नॅशनल हेराल्डच्य विशेष अंकाचे अनावरण करताना दिसतात. यामध्ये स्पष्ट दिसते की, पहिल्या पानावर कन्नड भाषेतील जाहिरात आहे. 

2383eb3ba27742809149db9d9fc675c8-2383eb3ba27742809149db9d9fc675c8-a97bf07acd06cc20bd0f6a706700e70e-1440x960.jpg

मूळ बातमी येथे वाचा – राज्यसभा टीव्हीअर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, सदरील व्हायरल फोटोमध्ये राहुल गांधी कन्न्ड भाषेतील पेपर वाचत नव्हते. त्यांच्या हातात नॅशनल हेराल्ड हा इंग्रजी पेपर होता. हा फोटो या पेपरच्या विशेष अंकाचे बंगळुरूमध्ये झालेल्या प्रकाशन सोहळ्यातील आहे. इंग्रजी भाषेतील या अंकाच्या पहिल्या पानावर कन्नड भाषेतील जाहिरात आहे. त्यावरून लोक चुकीचा दावा करीत आहेत.

Avatar

Title:राहुल गांधी कन्नड भाषेतील वृत्तपत्र वाचत नव्हते. वाचा त्या व्हायरल फोटोचे सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False