तथ्य पडताळणी : घरात 9 जण असताना मिळाली 5 मतं काय आहे सत्य

False राजकीय | Political

घरात 9 जण असताना एका उमेदवाराला केवळ 5 मते मिळाली, असे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

पंजाबमधील जालंधर मतदारसंघात नीतू शर्टन असे या उमेदवाराचे नाव असल्याचे याबाबत देण्यात आलेल्या वृत्तात म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन नीतू शर्टन यांना किती मिळाली याचा शोध घेतला असता नीतू शर्टनवाला यांना 856 मते मिळाली असल्याचे दिसून येते.

अक्राईव्ह

नीतू शर्टनवाला हे मग का रडले आणि कधी रडले असा प्रश्न उपस्थित पहिल्या फेरीनंतर त्यांना अतिशय कमी मते मिळाल्याने ते रडले. दैनिक ट्रिब्यून या इंग्रजी संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

अक्राईव्ह

निष्कर्ष

नीतू शर्टनवाला या उमेदवाराला 5 मते मिळाली नसून 856 मते मिळाली असल्याचे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरुन स्पष्ट होत आहे. तो रडतानाचा व्हिडिओ हा पहिल्या फेरीनंतरचा आहे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत त्याला केवळ 5 मते मिळाल्याची बाब असत्य सिध्द झाली आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणी : घरात 9 जण असताना मिळाली 5 मतं काय आहे सत्य

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False