Fact : जवाहरलाल नेहरूंचे हे छायाचित्र अमेरिकेतील नव्हे तर रशियातील

False राजकीय

हे 1954 मधील अमेरिकेतील छायाचित्र. ब्रॅंडिंग नाही, सोशल मीडिया नाही आणि उगीच हवा नाही. हाडाचे नेते हे आपल्या कामगिरीवरुन ओळखले जातात. नुसती टकळी चालवून नाही, अशी माहिती देत भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे एक छायाचित्र युती खाते माती या फेसबुक पेजवर देण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

मूळ फेसबुक पोस्ट / Archive 

तथ्य पडताळणी 

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे हे छायाचित्र कुठले आणि कधीचे आहे, हे शोधण्यासाठी आम्ही हे छायाचित्र रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी आम्हाला हे छायाचित्र अमेरिकेतील आणि रशियातील असल्याचे दोन पध्दतीचे दावे दिसून आले. त्यानंतर हे छायाचित्र रशियात आहे हे शोधण्याचाही आम्ही प्रयत्न केला. हे छायाचित्र क्रॉप करत आम्ही पुन्हा रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर आम्हाला खालील परिणाम दिसून आला. 

या माहितीत अनेक ठिकाणी जवाहरलाल नेहरु यांनी रशियाला 1956 मध्ये भेट दिल्याचा दावा केल्याचे दिसून येते. 

आम्ही जवाहरलाल नेहरु यांनी रशियाला नेमकी कधी भेट दिली हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी रशियाला 1955 मध्ये भेट दिल्याचे दिसून आले.

याच दरम्यान आम्हाला यांडेक्समध्ये रिव्हर्स इमेज सर्च करताना काही रशियन संकेतस्थळावरील लेख दिसून आले. या लेखात 1955 साली नेहरु हे इंदिरा गांधींसमवेत रशियाच्या मॅग्नीटोगोर्स्क शहरात नागरिकांना अभिवादन करत असल्याचे म्हटले आहे.

EtoretroArchived Link
MagmetallArchived Link
HornewsArchived Link

हे छायाचित्र ट्विट करत ते अमेरिकेतील असल्याचा दावा काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी सुरुवातीला केला होता. ही चूक लक्षात येताच त्यांनी तो कदाचित तो रशियात असल्याचे ट्विट केल्याचेही आपण खाली पाहू शकता.

निष्कर्ष

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे हे छायाचित्र अमेरिकेतील नाही. नेहरू यांचे हे छायाचित्र ते रशियाच्या दौऱ्यावर असताना 1955 मध्ये काढण्यात आलेले आहे. त्यामुळे हे छायाचित्र अमेरिकेतील आणि भारतातीलच असल्याचा दावा फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळला आहे. 

Avatar

Title:Fact : जवाहरलाल नेहरूंचे हे छायाचित्र अमेरिकेतील नव्हे तर रशियातील

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False