लोटस टॉवरचा वापर चीनकडून भारताची हेरगिरी करण्यासाठी खरेच होतो का? सत्य पडताळणी

False आंतरराष्ट्रीय

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये श्रीलंका सहल सफरवर असणाऱ्या एका ग्रुपमधील व्यक्तीने श्रीलंकेतील कोलंबो या शहरातील सर्वात उंच टॉवर असणाऱ्या इमारतीचा उल्लेख चीन भारतावर हेरगिरी करण्याच्या उद्देशाने करत आहे, असे म्हटले आहे. त्या बद्दल फॅक्ट क्रिसेंडो टीमने केलेली सत्य पडताळणी

फेसबुक

अर्काईव्ह

सत्य पडताळणी

फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून सत्य पडताळणी होईपर्यंत या पोस्टला फेसबुकवर पंकज कोटलवार या व्यक्तीच्या फेसबुक अकाउंटवर 226 वेळा शेअर, 479 लाईक्स आणि 118 कमेंटस् मिळाल्या आहेत. याशिवाय फेसबुकवर इतर अनेक फेसबुक पेज, अकाउंटवर ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, कोलंबो शहरातील ही सर्वात उंच इमारत असून, ते चीनच्या मालकीचे हॉटेल आहे. हे फक्त नावालाच हॉटेल आहे, खरंतर हे ठिकाण भारताच्या सॅटलाईटवर लक्ष ठेवण्यासाठी उभारलेला तळ आहे.

या विषयावर सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वप्रथम पोस्टमध्ये दिलेल्या फोटोला गुगल सर्च इमेज केले. त्यानंतर खालील रिझल्टस् समोर आले.

कोलंबोतील सर्वात उंच इमारतीचे नाव लोटस टॉवर आहे. श्रीलंका देशातील हा एक महत्वाचा प्रॉजेक्ट असून, हे टॉवर श्रीलंकेतील सर्वात मोठे मल्टी फंक्न्शनल टेलीकम्युनिकेशन आणि एंटटेंनमेंट सेंटर आहे. MULTI-FUNCTIONAL TELECOMMUNICATION TOWER AND ENTERTAINMENT CENTER CONSTRUCTION PROJECT आहे. विकीपीडियामध्ये दिलेल्या माहितीनुसार लोटस टॉवर ही इमारत 20 जानेवारी 2012 रोजी बांधण्यास सुरुवात झाली. ऑक्टोबर 2017 या वर्षी ही इमारत बांधून पुर्ण झाली. स्थानिकांना, प्रेक्षकांना, पर्यटकांना बघण्यासाठी 2017 च्या शेवटी खुली करण्यात आली.

विकीपीडिया l अर्काइव्ह

ही इमारत एक सिंगल ट्रांन्समिशन हब प्रमाणे काम करत असून, येथून टीव्ही, रेडिओ तसेच डिजिटल ट्रांन्समिशन करण्यात येते. याशिवाय या इमारतीमध्ये शिपिंग सेंटर, फूड कोर्टस्, वॉल्क-थ्रु संग्रहालय आहे. तसेच एक बॅंक्वेट हॉल आणि निगराणी स्थळ देखील आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती आपण येथे वाचू शकता.

रॉर मीडिया l अर्काईव्ह

लोटस टॉवर या इमारतीबद्दल माहितीचा एक व्हिडिओ रॉर मीडिया यांनी युट्युबवर अपलोड केला आहे. हा व्हिडिओ आपण येथे बघू शकतात.

अर्काईव्ह

लोटस टॉवर बांधण्यासाठी श्रीलंका देशाने चीन मधील एक्झिम बॅंक ऑफ चीन यांच्या कडून युएस डॉलर 100 मिलीयन आर्थिक मदत घेतली आहे. या संदर्भातील करार श्रीलंका आणि चीन यांच्या मध्ये झाला आहे. हा करार आपण खाली दिलेल्या लिंकवर सविस्तर वाचू शकता.

श्रीलंका – चीन लोटस टॉवर करारअर्काईव्ह

लोटस टॉवर या संदर्भातील श्रीलंका आणि चीन यांच्यामध्ये झालेल्या आर्थिक करार याविषयी युट्युबवर कोलंबो लोटस टॉवर या चॅनलने 25 डिसेंबर 2017 व्हिडिओ अपलोड केला आहे.

अर्काईव्ह

याचप्रमाणे DIETHELM Travel या वेब पेजवर लोटस टॉवर विषयी सविस्तर माहिती प्रसिद्ध केली आहे. या माहितीनुसार या टॉवरच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर 50 रेडिओ ब्रॉडकास्टरर्स, 20 टेलीकम्युनिकेशन सर्विस प्रोव्हायडर, 50 टेलीव्हिजन ब्रॉडकास्टरर्स यांची कार्यालये आहेत. तसेच या लोटस टॉवरमध्ये एकाचवेळी 450 व्यक्ती बसू शकतील इतके मोठे 2 बॅंक्वेट हॉल, कॉन्फरन्स रुम, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल आणि इतर सुविधा आहेत. या बद्दलची माहिती आपण खाली दिलेल्या लिंकवर वाचू शकता.

DIETHELM Travelअर्काईव्ह

या विषयावर श्रीलंकेच्या भारतातील दुतावास कार्यालयाशी फोनवर संपर्क केला असता, त्यांनी यासंदर्भात विचारल्यानंतर केवळ तसे काही नाही असे उत्तर दिले. वायरल होणारी पोस्टमधील मजकूर चुकीचा आहे. याशिवाय दुतावासास इमेल केल्यानंतर त्यांच्याकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही.

संपुर्ण तथ्यांचा अभ्यास केल्यानंतर असे आढळून आले की, कोलंबो शहरातील सर्वात उंच इमारत लोटस टॉवर या इमारतीमध्ये विविध कार्यालये आणि अनेक सुविधा असणारे शॉपिंग मॉल, इतरही गोष्टी आहेत. पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे भारताच्या सॅटेलाइटवर नजर ठेवण्यासाठी उभारलेले तळ आहे, हे तथ्य खोटे आहे.

निष्कर्ष : कोलंबोमधील सर्वात उंच इमारत बांधण्यासाठी श्रीलंका सरकारने चीन सरकारची आर्थिक मदत घेतली आहे. परंतू व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे भारताच्या सॅटेलाइटवर लक्ष ठेवण्यासाठी आणि भारताच्या हिंदी महासागरातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी उभारलेला तळ आहे ही माहिती खोटी आहे.

Avatar

Title:लोटस टॉवरचा वापर चीनकडून भारताची हेरगिरी करण्यासाठी खरेच होतो का? सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: False


1 thought on “लोटस टॉवरचा वापर चीनकडून भारताची हेरगिरी करण्यासाठी खरेच होतो का? सत्य पडताळणी

  1. हा मी लिहलेला लेख आहे, आणि मी खोटे लिहले नाही, officially हे कधीही मान्य होणार नाही, की ती इमारत चीनची गुप्त रेडिओ यंत्रणा आहे, त्या इमारतीमध्ये सर्वसामान्य श्रीलंकन लोकांनाही प्रवेश नाही! आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद आणि आभार!

Comments are closed.