Fact Check : अमरावतीमधील अंबादेवी मंदिरात दहशतवादी पकडण्यात आले का?

False राष्ट्रीय सामाजिक

विदर्भातील अमरावती येथील अंबा देवी मंदिरात दहशतवादी पकडण्यात आले आहेत, असा दावा करणारी पोस्ट Heer Nileshkumar Morabiya यांनी हिंदी सुविचार या पेजवर मराठीत प्रसिध्द केली आहे. या पोस्टची फॅक्ट क्रेसेंडोने तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी  

अमरावतीत दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे का, याची माहिती घेण्यासाठी आम्ही गुगलवर अमरावतीत दहशतवाद्यांना पकडले असा शब्दप्रयोग करुन शोध घेतला. त्यावेळी खालील परिणाम दिसून आला. 

या परिणामात अपेक्षित माहिती न मिळाल्याने आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेला. युटूयूबवर अमरावतीत दहशतवाद्यांनी पकडल्याची काही माहिती मिळते का हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विदर्भ न्यूज 365 चे खालील वृत्त आम्हाला दिसून आले. यात स्थानिक पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने अंबादेवी मंदिरात मॉक ड्रील घेण्यात आल्याचे सांगितले आहे. हा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता. 

गायत्री टेलिव्हिजननेही 29 जुलै 2019 रोजी याबाबतचे वृत्त दिले आहे. अमरावतीचे पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्याशी आम्ही संपर्क केला असता त्यांनीही पोलिसांचे हे मॉक ड्रिल असल्याचे सांगितले. अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयानेही ही मॉकड्रील असल्याचे सांगितले. अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीही ही मॉकड्रील असल्याचे सांगितले.

निष्कर्ष

महाराष्ट्रातील अमरावती येथील अंबादेवी मंदिरात पोलिसांनी दहशतवाद्यांना पकडलेले नाही. पोलिसांनी या मंदिराच्या परिसरात मॉक ड्रील घेतले होते. या घटनेचा व्हिडिओ चुकीच्या माहितीद्वारे पसरविण्यात येत आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.   

Avatar

Title:Fact Check : अमरावतीमधील अंबादेवी मंदिरात दहशतवादी पकडण्यात आले का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False