हा बांग्लादेश युद्धातील बलात्कार पीडितेचा फोटो नाही. हा ‘कॉलरा’च्या रुग्णाचा फोटो आहे. वाचा सत्य

False राजकीय

सोशल मीडियावरील एका व्हायरल फोटोद्वारे दावा करण्यात येत आहे की, बांग्लादेश स्वातंत्र्य संग्रामादरम्यान बलात्कार झालेल्या आपल्या पत्नीचा मृतहेह घेऊन जाणाऱ्या पतीचा हा फोटो आहे. फेसबुक पोस्टमध्ये आवाहन करण्यात आहे की, बांग्लादेशमध्ये अशा अत्याचार पीडित शरणार्थींना भारत सरकार नागरिकत्व देणार आहे. त्यामुळे सीएए-एनआरसीला समर्थन करावे.

फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली असता कळाले की, हा फोटो बलात्कार पीडित महिलेचा नाही. 

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये फोटोसोबत म्हटले की, बांगलादेश जेव्हा स्वतंत्र होत होता, तेव्हाचा फोटो आहे हा. फोटोमध्ये आहेत डॉ. धर्मवीर भारती! हा फोटो त्या काळात धर्मयुग नावाच्या मासिकात छापून आला होता! एक असहाय पती, बांगलादेशाच्या स्वतंत्रता संग्रामात एका नंतर एक असे अनेक बलात्कार सहन करून मृत पावलेल्या आपल्या पत्नीचा मृतदेह हातावर घेऊन हा प्रश्न विचारतोय, की आता काय करू ? कुठे जाऊ ? आज पन्नास वर्षांनंतर जेंव्हा मोदी सरकारने अश्या सतावल्या गेलेल्या आणि हाल भोगलेल्या लोकांना आसरा देण्यासाठी कायदा बनवला.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

सदरील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा फोटो कॉलरा रोगाने ग्रस्त महिलेचा आहे. Hard Rain Project नावाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार हा फोटो मार्क एडवर्ड्स नावाच्या छायाचित्रकाराने 1971 साली काढला होता. त्याकाळी बांग्लादेशमध्ये कॉलराची भयंकर साथ पसरली होती. तर अशाच एका कॉलराच्या रुग्णाचा हा फोटो आहे.

मूळ फोटो येथे पाहा – Hard Rain ProjectHD Image

याविषयी अधिक माहिती घेतली असता जॉन टायलर लिखित Body Horror: Photojournalism, Catastrophe and War नावाच्या पुस्तकात या फोटोसंबंधी माहिती दिलेली आहे. यात म्हटले की, कोलकात्यातील रस्त्यावर आपल्या कॉलराग्रस्त पत्नीला घेऊन जातानाचा हा मार्क एडवर्ड्सने काढलेला फोटो इंडिपेडेंट ऑन संडे पेपरने 1993 साली प्रसिद्ध केला होता. कॉलरामुळे 1971 साली सुमारे 22 हजार जणांचे प्राण गेले होते.

मूळ पुस्तक येथे वाचा – गुगल बुक्सअर्काइव्ह

Rare Historical Photos नावाच्या वेबसाईटवरदेखील हा फोटो उपलब्ध आहे. छायाचित्रकार मार्क एडवर्ड्सने यांनी सांगितले होते की, बांग्लादेश युद्धादरम्यान कॉलरामुळे घायाळ झालेल्या पत्नीला घेऊन जातानाचा हा फोटो माझ्या मनात घर करून गेला होता. 

मूळ फोटो येथे पाहा – Rare Historical Photos

फॅक्ट क्रेसेंडोच्या मल्याळी आणि ओडिया भाषेतील वेबसाईटनेदेखील या फोटोची पडताळणी केली होती. 

निष्कर्ष

यावरून हे स्पष्ट होते की, हा फोटो बांग्लादेश युद्धादरम्यान बलात्कार पीडितेचा नाही. हा फोटो मार्क एडवर्ड्स यांनी काढला होता. बांग्लादेश स्वातंत्र्य संग्रामादरम्यान 1971 साली कॉलराची साथ पसरली होती. फोटोतील महिला कॉलराने ग्रस्त होती. त्यामुळे फेसबुकवरील क्लेम चुकीचा आहे.

Avatar

Title:हा बांग्लादेश युद्धातील बलात्कार पीडितेचा फोटो नाही. हा ‘कॉलरा’च्या रुग्णाचा फोटो आहे. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False