अब्दुल कलामांच्या बालपणीचा फोटो नरेंद्र मोदींच्या नावे व्हायरल. वाचा सत्य काय आहे

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

सोशल मीडियावरील एक जून्या काळातील फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, तो नरेंद्र मोदी यांच्या बालपणातील आहे. या फोटोमधील लहान मुलगा म्हणजे नरेंद मोदी आणि सोबत त्यांची आई असल्याचे म्हटले आहे. मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपध घेण्याच्या पार्श्वभूमीवर मोदींचे जूने फोटो सोशल मीडियावर शेयर केले जात आहेत. परंतु, या फोटोबद्दल अनेकांनी शंका घेतली. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोने त्याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये एक पिवळसर रंगातील (सेपिया टोन) फोटो शेयर करण्यात आला आहे. यामध्ये कथित बाल नरेंद्र गादीवर बसलेले असून, त्यांची आई खुर्चीवर बसलेली आहे. सोबत लिहिले की, हा तोच मुलगा आहे, ज्याने 135 कोटी लोकांना हादरून सोडले. नरेंद्र मोदी आपली आई हिराबेन यांच्यासोबत दिसत आहेत.

तथ्य पडताळणी

या फोटोला यांडेक्स रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर हा फोटो नरेंद्र मोदींऐवजी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या बालपणीचा असल्याचे रिझल्ट समोर आले. यापैकी दैनिक भास्करच्या वेबसाईटवर खाली दिलेला एक कृष्णधवल फोटो उपलब्ध आहे. यामध्ये तीन लहान मुले पलंगावरी बसलेली असून, सोबत एक पुरुष आणि महिला आहे. फोटो कॅप्शननुसार हा फोटो अब्दुल कलाम यांच्या बालपणीचा आहे. डावीकडून दुसरा मुलगा म्हणजे बाल कलाम त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ-बहिण, वडिल जैनुलाब्दीन आणि आई आशियाम्मा दिसत आहेत. इंडिया डॉट कॉम आणि दैनिक जागरणच्या वेबसाईटवरदेखील हा फोटो उपलब्ध आहे.

मूळ फोटो येथे पाहा – दैनिक भास्करअर्काइव्ह

हाच फोटो इफेक्ट देऊन सेपिया टोनमध्ये इंटरनेटवर उपलब्ध आहे. युवरस्टोरी या वेबसाईटवर तो तुम्ही पाहू शकता.

पोस्टमधील फोटो आणि मूळ फोटो यांची तुलना केली असता, हे स्पष्ट होते की दोन्ही फोटो सारखेच आहेत.

निष्कर्ष

पोस्टमध्ये दिलेला हा फोटो नरेंद्र मोदींच्या बालपणातील नसून, अब्दुल कलाम यांच्या बालपणीचा आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:अब्दुल कलामांच्या बालपणीचा फोटो नरेंद्र मोदींच्या नावे व्हायरल. वाचा सत्य काय आहे

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •