पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या एका मुलाखतीची क्लिप शेअर करून दावा केला जात आहे की, केजरीवाल यांनी अखेर मान्य केले की ते जन्माने भाजपचे आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले, की ही अर्धवट क्लिप आहे. केजरीवाल यांनी असे मान्य केलेले नाही. वाचा सत्य –

काय आहे व्हिडिओमध्ये?

क्लिपमध्ये केजरीवाल म्हणातात, की “हमारा जनसंघ का परिवार है. पैदाशी बीजेपीवाले है हम. मेरे पिताजी जन संघ में थे. इमर्जन्समी में जेल गए थे.”

या व्हिडिओसोबत म्हटले की, केजरीवाल यांनी मान्य केले की, ते आणि त्यांचे कुटुंब संघाचे आहेत.

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

व्हिडिओतील की-फ्रेम्सला रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले, की एनडीटीव्ही वाहिनीवरील अरविंद केजरीवाल यांच्या मुलाखतीची ही क्लिप आहे.

4 फेब्रुवारी 2020 रोजी ही मुलाखत प्रसारित करण्यात आली होती. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आधी केजरीवाल यांनी ही मुलाखती दिली होती. यात त्यांनी भाजपवर शाहीन बाग

मूळ पोस्ट – फेसबुक

या व्हिडिओच्या सातव्या मिनिटापासून तुम्ही ऐकू शकता, की केजरीवाल म्हणतात – “मैं एक टीवी चैनल पर देख रहा था कि एक बीजेपीवाला बोल रहा था - “हमारा जनसंघ का परिवार है. पैदाशी बीजेपीवाले है हम. मेरे पिताजी जन संघ में थे. इमर्जन्समी में जेल गए थे. लेकिन वो बोला कि इसबार केजरीवाल को वोट दुंगा. अँकर ने उससे पूंछा ‘क्यों’? तो उसने बोला कि मेरा बच्चा सरकारी स्कूल में पढ़ता है और इतना बुरा हाल होता था सरकारी स्कूलों का. लेकिन इन्होंने (केजरावील) मेरे बच्चे का भविष्य बना दिया.”

यावरून समजते, की केजरीवाल एका भाजप समर्थकाबद्दल बोलत होते. ते स्वतःच्या कुटुंबाविषयी बोलत नव्हते.

अर्धवट व्हायरल क्लिप आणि मूळ व्हिडिओ यांची तुलना पाहिल्यावर हा फरक लक्षात येईल.

https://www.youtube.com/watch?v=-kNvvsOvvhw

निष्कर्ष

अर्धवट क्लिप शेअर करून चुकीचा दावा केला जात आहे की, केजरीवाल जन्माने भाजपचे सदस्य आहेत. मूळात त्यांनी असे म्हटलेलेच नाही. ते एका भाजप समर्थकाचे उदाहरण देत होते.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:“जन्माने मी भाजपचा सदस्य” असे अरविंद केजरीवाल म्हणाले का? अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Fact Check By: Agastya Deokar

Result: False