आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील मुलींच्या लग्नाची जबाबदारी लाडली फाउंडेशन नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेने स्वीकारली असून ही संस्था अशा मुलींचे लग्न करुन देते आणि लग्नात एक लाखाचे घरगुती साहित्याची मदत करत असल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

लाडली फाउंडेशनच्या या उपक्रमाविषयी माहिती घेण्यासाठी आम्ही पोस्टमध्ये असलेल्या क्रमांकावर आम्ही संपर्क साधला असता हे क्रमांक बंद असल्याचे आमच्या लक्षात आले. या वाचकाने आपल्या कमेंटमध्येही ही बाब या पोस्टच्या खाली नमूद केली आहे.

अक्राईव्ह

त्यानंतर आम्ही लाडली फाउंडेशनबाबत अन्य काही माहिती मिळते का, हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी खालील माहिती आमच्या समोर आली.

लाडली फाउंडेशनच्या फेसबुक पेजवरील एका क्रमांकावर संपर्क करण्यात आम्ही यशस्वी झालो. फॅक्ट क्रेसेंडोने तान्या चड्ढा – प्रमुख समन्वयक – लाडली फाउंडेशन ट्रस्टशी यांच्याशी याबाबत संवाद साधला. त्यांनी आम्हाला याबाबत खालील माहिती दिली.

“Firstly, we conduct only mass weddings. We do not sponsor individual weddings. In weddings, we provide them gifts to start their new life. We are also trying to give them some health insurance, so that when the girl gets married and enters a new home and she falls sick; she should not hear the common taunts that she has brought ill health with her and can take care of her medical expenses. There is a myth that we are fighting against by providing them health insurance and gifts to start a new life, but we do not give any cash or anything else. The girls that we help get married through mass weddings belong to very poor sector of the country. Either they sell themselves or their parents sell them off for money, if they do not get married. For their society, marriage is the only issue and because of this issue, their life is becoming hell day-by-day.

So far, we have got approximately 1700 beneficiaries married in around 10 mass marriages. Our foundation runs a self-contributed cause and we have not taken a single rupee donation from any donor or any government body.”

या माहितीत कुठेही थेट एक लाखाची मदत करण्यात येईल म्हटलेले दिसून येत नाही. या संस्थेने 10 सामूहिक विवाह सोहळ्यात 1700 जोडप्यांचे विवाह केले आहेत. ही स्वयंसेवी संस्था कोणत्याही दात्याकडून आणि सरकाकडून मदत घेत नसल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. ‘Akash BJP’ या फेसबुक पेजवर आम्हाला एक कमेंट दिसून आली यात स्पष्टपणे ही योजना गतवर्षीचे असल्याचे म्हटले आहे. ही पोस्ट 30 मार्च 2017 रोजी करण्यात आलेली आहे.

या कमेंटमध्ये किती सत्य आहे, हे शोधण्याचाही आम्ही प्रयत्न केला. त्यासाठी आम्ही गुगलवर “samuhik vivah 2016 ladli foundation” असे सर्च केले. त्यावेळी आम्हाला खालील रिझल्ट मिळाला.

फेसबुकवरील पहिल्या लिंकवर क्लिक करुन आम्ही 3 डिसेंबर 2015 च्या एका पोस्टवर पोहचलो. त्यांनी या ठिकाणी WhatsApp आणि सोशल मीडियावर पसरणाऱ्या या पोस्टविषयी स्पष्टीकरण दिले आहे.

लाड़ली फाउंडेशन से सम्बंधित सन्देश के बारे में सभी को सूचित करना चाहता हूँ कि किसी WhatsApp ग्रुप द्वारा हमारे सन्देश को गलत Edit करके पूरे देश भर में लाखों की संख्या में भेजा गया है जिसके कारण हमें देश भर से भारी मात्रा में कॉल प्राप्त हो रहे है जोकि सभी कॉल का जवाब देना संभव नहीं हो पा रहा है ।इसलिए उन नम्बरो को बंद कर दिया गया है। तथा हजारो की संख्या में देश भर से लोग कॉल करके परेशान हो रहे हैं।

आपको बताना चाहता हूँ की लाड़ली फाउंडेशन द्वारा 29 नवम्बर 2015 को दिल्ली के छत्तरपुर मंदिर मैदान में 51 असमर्थ कन्याओं का सामूहिक विवाह आयोजित किया जा चुका है ।जिसमे हिन्दू।मुस्लिम व अन्य सभी धर्मो की गरीब कन्याओं का विवाह बड़े ही धूमधाम से कराया गया है। जिसमे प्रत्येक बेटी को लगभग घर का पूरा सामान उपहार स्वरुप दिया गया।

लाड़ली फाउंडेशन सिर्फ अपने सामूहिक विवाह कार्यक्रम में गरीब बेटियों को घरेलु सामान व अन्य मदद करती है इसके अलावा कोई और मदद नहीं करती।

संस्था के अगले कार्यक्रम की सूचना संस्था के फेसबुक पर पोस्ट कर दी जायेगी। सभी से निवेदन है की लाड़ली संस्था से सम्बंधित किसी भी प्रकार की जानकारी के लिए संस्था के फेसबुक पेज पर जुड़ सकते हैं।

देवेन्द्र गुप्ता
राष्ट्रीय युवा पुरस्कार धारक
अध्यक्ष, लाड़ली फाउंडेशन
9871727415, 9873182468

इस सन्देश को पिछले सन्देश की तरह अधिक से अधिक शेयर करके ताकि जरूरतमंद गरीब लोगों को सही व पूरी जानकारी मिल सके और वो कॉल करके परेशान न हों । पुनः अपना स्नेह प्रदान करें ताकि ज्यादा से ज्यादा लोगो को सही जानकारी मिल सके ।

लाड़ली फाउंडेशन द्वारा किये गए कार्यो को जानने व फोटो और वीडियो देखने के लिए निचे दिए लिंक पर क्लिक करके लाड़ली फाउंडेशन के फेसबुक पेज को देखे व लिखे करें।

https://m.facebook.com/Laadlifoundation/

Archived Link

या माहितीच्या आधारे हे लक्षात येते की, ही मूळ पोस्ट 2015 ची आहे. लाडली फाउंडेशनने याबाबत 2017 मध्ये खुलासाही केला आहे. ही पोस्ट 2019 मध्ये असत्य माहिती पसरवत आहे.

निष्कर्ष

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील मुलींच्या लग्नाची जबाबदारी लाडली फाउंडेशन नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेने स्वीकारली असून ही संस्था अशा मुलींचे लग्न करुन देते आणि लग्नात एक लाखाचे घरगुती साहित्याची मदत करते. हा दावा फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणी असत्य सिध्द झाला आहे. हा मेसेज 2015 सालासाठी होता तो आताही 2019 मध्ये चुकीच्या पध्दतीने पसरवण्यात येत आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणी : लाडली फाउंडेशनच्या या मेसेजचे सत्य काय?

Fact Check By: Dattatray Gholap

Result: False