जुनेच फोटो वायनाड रॅलीचे फोटो म्हणून व्हायरल. पाहा सत्य काय आहे

Mixture/अर्धसत्य राजकीय

राहुल गांधींनी केरळमधील वायनाड येथून गुरुवारी (4 एप्रिल) लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी काढलेल्या रोड शोमधील काही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही सोशल मीडिया युजर्सनी हिरवे झेंडे असलेले फोटो शेयर करून ते या रॅलीत असल्याचा दावा केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

अर्काइव्ह

वरील पोस्टमध्ये लिहिले की, राहुल (पप्पू) गांधी भारतात लोकसभेचा फॉर्म भरत आहे का पाकिस्तानात? का पक्षाचा झेंडा बदलला? दुसऱ्या एका युजरने लिहिले की, वायनाडमध्ये राहुल गांधी ने नामांकन भरले. वाद होऊ नये म्हणून काँग्रेसकडून कार्यकर्ते आणि समर्थकांना मुस्लिम लीगचा हिरवा झेंडा रैली मध्ये न आणण्यास सांगितले होते; पण आज रॅलीमध्ये ते झेंडे दिसलेच.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

राहुल गांधी यांनी 4 एप्रिल 2019 रोजी वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

अर्काइव्ह

त्यानंतर त्यांच्या रॅलीचे अनेक व्हिडियो आणि फोटो सोशल मीडियावर विविध दाव्यांसह फिरू लागले. सदरील दोन्ही पोस्टमध्ये दिलेल्या फोटोंची सत्यता पडताळणी करण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. तेव्हा आम्हाला दोन फोटो 4 एप्रिल रोजी काढलेल्या रॅलीतील नसल्याचे आढळले.

फोटो क्र. 1

पैकी एक फोटो इंडिया टुडे मॅगझीनमध्ये 4 मे 2016 रोजी प्रसिद्ध झालेल्या एका बातमीत वरील फोटो वापरण्यात आला आहे. या फोटोखाली दिलेल्या कॅप्शननुसार, हा फोटो इंडियन युनियन मुस्लिम लीगचे (आययूएमएल) राष्ट्रीय सरचिटणीस पी. के. कुन्हालीकुट्टी यांनी कोझिकोड येथे जानेवारी 2016 मध्ये काढलेल्या केरळ यात्रेतील आहे. हा फोटो टी मोहनदास या छायाचित्रकाराने काढलेले आहेत.

मूळ बातमी येथे वाचा – इंडिया टुडेअर्काइव्ह

केरळ मुस्लिम लीगच्या यूट्यूब चॅनेलवर या कार्यक्रमाचा व्हिडियो उपलब्ध आहे.

म्हणजे हा फोटो राहुल गांधींच्या वायनाड रॅलीतील ऩसून तीन वर्षांपूर्वीचा आहे.

फोटो क्र. 2

दुसरा फोटो टाइम्स ऑफ इंडियाने 2 एप्रिल रोजी दिलेल्या बातमीत वापरलेला आहे. राहुल गांधी 4 एप्रिल रोजी वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, त्यांच्यासोबत प्रियंका गांधीदेखील राहतील, अशी ही बातमी आहे. यावरून सिद्ध होते की, हा फोटो राहुल गांधींच्या गुरुवारीच्या रॅलीतील नाही.

मूळ बातमी येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडियाअर्काइव्ह

फोटो क्र. 3
हा फोटो टाईम्स ऑफ इंडियाच्या 4 एप्रिलच्या बातमीतील आहे. परंतु, येथे हा फोटो काँग्रेसच्या रॅलीतील आहे की नाही हे दिलेले नाही.

मूळ बातमी येथे पाहा – टाईम्स ऑफ इंडियाअर्काइव्ह

फोटो क्र. 4
हा फोटो केवळ ट्विटरवर उपलब्ध असून तो 4 एप्रिल नंतर केलेल्या ट्विटमध्येच आढळतो.

अर्काइव्ह

पोस्टमध्ये असेदेखील म्हटले आहे की, काँग्रेसने मुस्लिम लीगचे हिरवे झेंडे न आणण्यास सांगितले होते. परंतु, टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीत मुस्लिम लीगचे राज्य सरचिटणीस के. पी. ए. माजिद आणि वायनाड उपजिल्हाध्यक्ष टी मोहम्मद यांनी ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे.

बातमीत माजिद म्हणाले की, राहुल गांधीच्या रॅलीमध्ये मुस्लिम लीगचे झेंडे न वापरण्याचा कोणताही आदेश किंवा निर्णय घेण्यात आलेला नाही. अशा बातम्या पूर्णतः असत्य आहे. मोहम्मद यांनी सांगितले की, मतदारांना संभ्रमित करण्यासाठी अशा तऱ्हेच्या खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत.

मूळ बातमी येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडियाअर्काइव्ह

के. पी. ए. माजिद यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरदेखील यासंबंधीचा खुलासा दिला आहे. त्याचे भाषांतर होते की, मुस्लिम लीगच्या हिरवा झेंड्याचा आम्हाला अभिमान आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहुल गांधी वायनाड येथे येण्याच्या पार्श्वभूमीवर अफवा पसरविल्या जात आहेत. माझे नाव घेऊन असा अपप्रचार केला जात आहे की, मी राहुल गांधींच्या प्रचारामध्ये मुस्लिम लीगचे चिन्ह, झेंडे वापरत नाही. परंतु, ही गोष्ट पूर्णतः असत्य आहे.

अर्काइव्ह

निष्कर्ष

राहुल गांधींच्या रॅलीतील फोटो म्हणून जे चार फोटो शेयर केले जात आहेत, त्यापैकी एक फोटो तीन वर्षांपूर्वीचा आहे. एक रॅलीपूर्वीचा आहे. दुसरे दोन फोटो 4 एप्रिल नंतरच इंटरनेटवर उपलब्ध आहेत. ते रॅलीतील आहेत किंवा नाहीत असे ठामपणे म्हणण्यास सबळ पुरावे नाहीत. म्हणून ही पोस्ट मिश्रित/अर्धसत्य आहे.

Avatar

Title:जुनेच फोटो वायनाड रॅलीचे फोटो म्हणून व्हायरल. पाहा सत्य काय आहे

Fact Check By: Mayur Deokar 

Result: Mixture