कर्नाटकमधील गणपती मंदिराचा व्हिडियो त्र्यंबकेश्वरमधील शिवलिंगाच्या नावे व्हायरल. वाचा सत्य

False सामाजिक

त्र्यंबकेश्वर येथील शिवलिंगातून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडत असल्याचा म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडियो व्हायरल होत आहे. जगावर मोठे संकट येणार असल्याचा दावा या माध्यमातून करत आहेत. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडियो कर्नाटकमधील कंमडल गणपती मंदिराचा असल्याचे समोर आले.

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर डेलिमोशन या संकेतस्थळावरील पब्लिक टीव्हीचा 7 ऑगस्ट 2015 रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडियो आढळला. हे चिकमंगळूर जिल्ह्यातील कोप्पा येथील कमंडल गणपती मंदिरातील द्दश्य आहे. 

image5.png

संग्रहित

कर्नाटकमधील NBI Tv व अन्य एका स्थानिक वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले असल्याचेही दिसून येते.

संग्रहित 

याशिवाय metrosaga.com या संकेतस्थळावर 31 मार्च 2019 रोजी देण्यात आलेल्या माहितीनुसार हे मंदिर एक हजार वर्ष जुने आहे. दक्षिणेतील ब्राम्ही या नदीचे हे उगमस्थान आहे. 

image6.png

संग्रहित

खाली समाजमाध्यमात व्हायरल होत असलेल्या व्हिडियोतील आणि चिकमंगळूर येथील कमंडल गणपती मंदिरातील समानता दर्शविण्यात आली आहे.

image1.jpg

कमंडल गणपती मंदिर आणि त्र्यंबकेश्वर येथील मंदिरातील फरकही खाली दर्शविण्यात आला आहे.

image3.jpg

निष्कर्ष

यावरुन हे स्पष्ट होते की, समाजमाध्यमात पसरत असलेल्या व्हिडियो कर्नाटकमधील चिकमंगळूरच्या कमंडल गणपती मंदिरातील आहे. तो त्र्यंबकेश्वर मंदिरातील नाही.

Avatar

Title:कर्नाटकमधील गणपती मंदिराचा व्हिडियो त्र्यंबकेश्वरमधील शिवलिंगाच्या नावे व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False