राहुल गांधीसोबतची व्यक्ती नॅथन अँडरसन नाही; जर्मन नेत्यासोबतचा जुना फोटो व्हायरल 

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी 7 फेब्रुवारी रोजी लोकसभेतमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योजक गौतम अडाणी यांचे एकत्रीत फोटो दाखवून त्यांच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर लोकसभेत एकच गदारोळ माजला. 

या पर्श्वभूमीवर राहुल गांधींचा एक व्यक्तीसोबतचा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, राहुल गांधी यांनी अदानी समुदायाविरोधात गौप्यस्फोट करणाऱ्या ‘हिंडनबर्ग रिसर्च’ कंपनीचे संस्थापक नॅथन अँडरसन यांयी भेट घेतली होती. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटोमध्ये राहुल गांधीसोबत असलेली व्यक्ती नॅथन अँडरसन नाही. 

काय आहे दावा ?

व्हायरल फोटोमध्ये राहुल गांधीसोबत एक व्यक्ती दिसते. सोबत म्हटले की, “राहुल गांधीसोबत उभा असलेली व्यक्ती हिंडनबर्गचा संस्थापक नॅथन अँडरसन आहे. हा फोटो बघुन तर असच वाटत की, आदाणी विरोधात सादर केलेल्या अहवाला मागे कोण जबाबदार आहे.”

मूळ पोस्ट — फेसबुक

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटोमध्ये राहुल गांधीसोबत असलेली व्यक्ती नॅथन अँडरसन नाही.

इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार 22 ऑगस्ट 2018 रोजी तत्कालिन काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी इंग्लंड आणि जर्मनीच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी हॅम्बुर्ग येथे जर्मन फेडरल संसदेच्या बुंडेस्टॅगचे राज्यमंत्री आणि सदस्य नील्स अॅनेन यांची भेट घेतली होती.

खालील छायाचित्र पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल की, व्हायरल होत असलेला फोटो याच भेटीचा आहे. 

राहुल गांधी आणि अॅनेन यांनी या भेटीदरम्यान भारतीय आणि जर्मन राजकारण, केरळमधील पूर, जीएसटी आणि रोजगारावर चर्चा केली होती. 

काँग्रेसने या भेटीचे ट्विट केले फोटो आपण खाली पाहू शकतात.

हिंडनबर्गचे संस्थापक कोण आहेत ?

सध्या बहु चर्चेत असलेली ‘हिंडनबर्ग रिसर्च’ ही एक गुंतवणूक सल्लागार कंपनी आहे. तसेच या कंपनीच्या संस्थापकाचे नाव नॅथन अँडरसन आहे. खाली आपण त्यांचे छायाचित्र पाहू शकतो.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, राहुल गांधी यांनी हिंडनबर्गचे संस्थापक नॅथन अँडरसन याची भेट घेतली नव्हती. हा फोटो सहा वर्षांपूर्वीचा असून त्यामधील व्यक्ती जर्मनीचे नेते नील्स अॅनेन आहेत.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:राहुल गांधीसोबतची व्यक्ती नॅथन अँडरसन नाही; जर्मन नेत्यासोबतचा जुना फोटो व्हायरल 

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Misleading