Fact check : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांचा राजीनामा?

False राजकीय

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनाम्याचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त सध्या सोशल मीडियावर पसरत आहे. या वृत्ताची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आहे का? याची पडताळणी करण्यासाठी आम्ही राहुल गांधी यांच्या अधिकृत ट्विट अकाऊंटला भेट दिली. याठिकाणी आम्हाला अशी कोणतीही बाब दिसून आली नाही.

राहुल गांधी यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरही आम्हाला याबाबतची कोणतीही माहिती आढळून आली नाही.

अक्राईव्ह

इंडिया टूडेच्या संकेतस्थळानेही याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार राहुल गांधींनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव ठेवल्याचे काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी नाकारले आहे.

अक्राईव्ह

एएनआय या वृत्तसंस्थेनेही याबाबतचे वृत्त दिले असून ते आपण खाली पाहू शकता.

निष्कर्ष

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त काँग्रेसचे प्रवक्ते रणजीतसिंह सुरजेवाला नाकारले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact check : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांचा राजीनामा?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False