Fact Check : चीनमध्ये बोअरवेलच्या खड्ड्यात पडलेल्या बाळाला अवघ्या काही मिनिटात बाहेर काढण्यात आलं का?

Partly False सामाजिक

चीन किती प्रगती आहे. ३०० फूट बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला काही मिनिटात बाहेर काढले. आपण बसतो २४ तास मोठे खोदकाम करत असा दावा शांभवी कुलकर्णी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केला आहे. यासोबत त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive

तथ्य पडताळणी

चीनमध्ये बोअरवेलमध्ये चिमुकला पडला होता का, याचा आम्ही शोध घेतला. या शोधाच्या आधारे मिळालेल्या परिणामात आम्हाला ब्रिटनमधील dailymail.co.uk या संकेतस्थळावरील 6 एप्रिल 2016 रोजी प्रसिध्द झालेले एक वृत्त दिसून आले. यातून एक बाब तर स्पष्ट झाली की, ही घटना तीन वर्षापुर्वीची आहे. या बातमीसोबत आपण व्हिडिओ देखील पाहू शकतो. या वृत्तात स्पष्टपणे म्हटले आहे की, या तीन वर्षाच्या मुलाला 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर वाचविण्यात यश आलं. 

image3.png

Archive

या व्यतिरिक्त झी न्यूज या वृत्तवाहिनीनेही 5 एप्रिल 2016 रोजी या घटनेबाबत दिलेले वृत्त आपण खाली पाहू शकता. या वृत्तात 90 मीटर खोल खड्ड्यात पडलेल्या या मुलाची दोन तासानंतर सुटका करण्यात आल्याचे म्हटले आहे.

Archive

चीनची अधिकृत सरकारी दुरचित्रवाहिनी असलेल्या सीजीटीएन या वृत्तवाहिनीनेही या मुलाची दोन तासाने सुटका करण्यात आल्याचे म्हटले आहे. 

Archive

या सर्व संशोधनातून एक बाब स्पष्ट झाली की बोअरवेलच्या खड्यात हा चिमुकला पडला ही घटना तर सत्य आहे. त्यांची अवघ्या काही मिनिटात सुटका करण्यात आली ही बाब मात्र असत्य आहे.

निष्कर्ष    

चीनमध्ये बोअरवेलच्या खड्ड्यात तीन वर्षाचा चिमुकला पडला होता, ही घटना सत्य आहे. अवघ्या काही मिनिटात सुटका करण्यात आली ही बाब मात्र असत्य आहे. या मुलाची तब्बल दोन तासानंतर सुटका करण्यात आली. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट अर्धसत्य आढळली आहे. 

Avatar

Title:Fact Check : चीनमध्ये बोअरवेलच्या खड्ड्यात पडलेल्या बाळाला अवघ्या काही मिनिटात बाहेर काढण्यात आलं का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: Partly False