
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दसरा मेळाव्यातील एक फोटो टिंगलटवाळीचा विषय ठरत आहे. या व्हायरल फोटोत केजरीवाल यांनी उलटा धुनष्यबाण पकडल्याचे दिसते. या फोटोवरून सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली.
आमच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला आहे. हा फोटो एडिट केलेला आहे.
काय आहे दावा ?

मूळ पोस्ट – ट्विटर
तथ्य पडताळणी
या फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले असता कळाले की, हा फोटो दिल्लीमध्ये झालेल्या दसरा महोत्सवातील आहे. श्री धार्मिक लिला समितीने आयोजित केलेल्या या मेळाव्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह उपराष्टपती जगदीप धनखड़ व दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना उपस्थिती होते.
केजरीवाल यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून या मेळाव्याचे फोटो शेअर केलेले आहेत. यामध्ये स्पष्ट दिसते की, त्यांनी धनुष्यबाण सरळ पकडला होता.
व्हायरल फोटो आणि केजरीवाल यांच्या ट्विटरवरील फोटो या दोघांची तुलना केल्यावर लगेच कळते मूळ फोटोशी छेडछाड करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण महोत्सवाचा व्हिडिओदेखील उपलब्ध आहे. या व्हिडिओमध्ये 56 व्या मिनिटांपाशी दिसते की केजरीवाल यांनी सरळच धुनष्यबाण पकडला होता.

निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, अरविंद केजरीवाल यांचा हातात उलटा धनुष्यबाण घेतलेला फोटो बनावट आहे. केजरीवाल यांनी धनुष्यबाण सरळच पकडला होता.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:अरविंद केजरीवाल यांनी उलटा धनुष्यबाण पकडला नव्हता; बनावट फोटो होतोय व्हायरल
Fact Check By: Factcrescendo TeamResult: Altered
