‘खालसा एड’ च्या स्वयंसेवकांनी उत्तराखंडमधील लोकांना मदत केली का? वाचा सत्य

False सामाजिक

उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यात धौलीगंगा या नदीला पुर आला आणि त्यात ऋषीगंगा विद्युत प्रकल्प वाहून गेला. यादरम्यान सोशल मीडियावर पुरात अडकलेल्यांना मदत करतानाचा एक फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, ‘खालसा एड’ संघटनेतील लोकांनी उत्तराखंडमध्ये असे मदत बचावकार्य केले. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) शेअर करीत सत्यतेबाबत विचारणा केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ जुना आहे.

काय आहे दावा?

व्हायरल फोटोमध्ये एक पगडी घातलेली व्यक्ती पुरात अडकलेल्या लोकांना मदत करताना दिसतो. दावा केला जात आहे की, ज्यांनी खलिस्तानी म्हणून हिणवले त्यांच्याच ‘खालसा एड’ या संघटनेतील स्वयंसेवकांनी उत्तराखंडमध्ये अडकलेल्या लोकांची अशी मदत केली. 

फेसबुकअर्काइव्ह 

तथ्य पडताळणी 

सर्वप्रथम व्हायरल फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यानुसार बारूसाहिब या वेबसाईटने 31 ऑगस्ट राजी शेअर केलेला एक लेख आढळला. 

त्यानुसार हा फोटो अकाल अकादमी, खालसा एड आणि एसजीपीसी यांनी एकत्र येत केरळमधे कोची शहरातील पुरात अडकलेल्या लोकांची मदत केली होती तेव्हाचा आहे. 

अकाल अरादमीअर्काइव्ह

अधिक शोध घेतल्यावर ‘द ट्रिब्युन’ वृत्तपत्राने 20 ऑगस्ट 2018 रोजी प्रकाशित केलेला लेख आढळला. त्यानुसार केरळमधील कोची शहरात ‘खालसा एड’ इंटरनॅश्नल या संघटनेतील शीख स्वयंसेवकांनी पुरात अडकलेल्या लोकांसाठी लंगरचे आयोजन केले होते. या शिवाय पिण्याच्या पाण्याची आणि औषधाचीसुद्धा व्यवस्था केली होती.

द ट्रिब्युनअर्काइव्ह 

निष्कर्ष 

यावरून स्पष्ट होते की. व्हायरल होत असलेला फोटो उत्तराखंडमधील नसुन, 2018 साली केरळमध्ये आलेल्या पुराच्या वेळीचा आहे. जुना फोटो चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत आहे.

Avatar

Title:‘खालसा एड’ च्या स्वयंसेवकांनी उत्तराखंडमधील लोकांना मदत केली का? वाचा सत्य

Fact Check By: Milina Patil 

Result: False