सत्य पडताळणी : शबाना आझमीच्या हिंदूविरोधी वक्तव्याचा कंगनाचे प्रत्युत्तर

False सामाजिक
 • 73
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  73
  Shares

अभिनेत्री शबाना आझमी यांनी हिंदूविरोधी वक्तव्य केले असून त्याला अभिनेत्री कंगना राणावत हिने प्रत्युत्तर दिल्याची पोस्ट फालतुगिरी या फेसबुक पेजवरुन व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची सत्य पडताळणी केली आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

अभिनेत्री शबाना आझमी यांनी हिंदूविरोधी वक्तव्य केले आहे का? हे पाहण्यासाठी आम्ही शबाना आझमी यांच्या ट्विटर अकाऊंटला भेट दिली असता आम्हाला त्यांनी खाली दिलेले ट्विट दिसून आले.

आक्राईव्ह लिंक

स्वत: अभिनेत्री शबाना आझमी यांनी आपण कुठलेही हिंदूविरोधी वक्तव्य केल्याचा इन्कार केला आहे. त्याबाबतचे ट्विट त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन केले आहे.  

आक्राईव्ह लिंक

कंगना राणावत यांनी शबाना आझमी यांना खरंच काय प्रत्युत्तर दिलंय का हे शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी फॅक्ट क्रेसेंडोला न्यूज 18 ने दिलेले एक वृत्त दिसून आले.

आक्राईव्ह लिंक

याबाबतची मूळ बातमी डीएनए या वृत्तपत्राने दिली आहे. डीएनएच्या वृत्तात कंगनाने काय म्हटले आहे हे आपण पाहू शकता.

आक्राईव्ह लिंक

टाईम्स ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर असलेल्या एका वृत्तानुसार शबाना आझमी यांनी कंगना राणावत यांनी त्यांना देशविरोधी म्हटल्याने त्याला उत्तर दिले आहे.

आक्राईव्ह लिंक

विविध वृत्तपत्रांनी आणि संकेतस्थळांनी अभिनेत्री शबाना आझमी आणि कंगना राणावत यांच्यातील वादाच्या बातम्या दिल्या आहेत. या बातम्यामध्ये कुठेही पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा दिसून येत नाही.

या बातम्यांमध्ये कुठेही कंगना राणावत यांनी शबाना आझमी यांना पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे प्रत्युत्तर दिल्याचे कुठेही आढळून येत नाही.

निष्कर्ष

अभिनेत्री कंगना राणावत यांनी शबाना आझमी यांना पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे प्रत्युत्तर दिल्याचे कुठेही आढळून आले नाही. त्यांनी शबाना आझमी यांना दिलेले उत्तर हे केवळ पुलवामा हल्ल्याबद्दलचे आहे. हिंदू धर्माबद्दलचे नाही. त्यामुळे कंगना राणावत यांनी शबाना आझमी यांना प्रत्युत्तर दिल्याची ही पोस्ट फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळली आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : शबाना आझमीच्या हिंदूविरोधी वक्तव्याचा कंगनाचे प्रत्युत्तर

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False


 • 73
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  73
  Shares

1 thought on “सत्य पडताळणी : शबाना आझमीच्या हिंदूविरोधी वक्तव्याचा कंगनाचे प्रत्युत्तर

Comments are closed.