व्हाईट व्हाऊसमध्ये आंदोलक घुसल्याचा हा व्हिडियो नाही; वाचा या व्हिडियोमागचे सत्य

False आंतरराष्ट्रीय

पोलिसांच्या हातून एका कृष्णवर्णीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत आंदोलने होत आहेत. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागून जाळपोळ आणि लुटमारीच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, एका व्हिडियोद्वारे दावा केला जात आहे की, सुरक्षाकवच भेदून आक्रमक आंदोलक व्हाईट हाऊसमध्ये घुसले.

फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत पडताळणी केली असता, हा व्हिडियो व्हाईट व्हाऊसचा नसल्याचे समोर आले.

काय आहे व्हिडियोमध्ये?

एका मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये हिंसक आंदोलक घोषणा देत एका पांढऱ्या रंगाच्या इमारतीवर दगडफेक करीत आहेत. सोबत दावा केला जात आहे की, “अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्षचे निवासस्थान व्हाईट हाऊसचे अभेद्य सुरक्षा कवच तोडून आंदोलनकर्ते थेट आत घुसले आहेत”.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

विविध की-वर्ड्स आणि रिव्हर्स इमेज सर्च द्वारे शोध असता, हा व्हिडियो व्हाईट हाऊस येथील नसल्याचे कळाले.

चॅड सिंकलेयर नामक युट्यूब अकाउंटवरून 31 मे रोजी पुढील व्हिडियो अपलोड करण्यात आला होता. सोबतच्या माहितीनुसार, ओहायो स्टेट हाऊस येथील आंदोलनाचा हा व्हिडियो आहे. 

हा धागा पकडून अधिक शोध घेतला. ओहायो स्टेट हाऊसच्या फोटोची व्हिडियोतील इमारतीशी तुलना केल्यावर लगेच कळते की, ही इमारत ओहायो स्टेट हाऊसची आहे.

ohiostate.png

एनबीसी-4 वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार, जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाच्या हत्येविरोधात आंदोलन करणाऱ्या काही लोकांनी 28 मे रोजी ओहायो राज्याचे मुख्य कार्यालय असणाऱ्या ओहायो स्टेट हाऊस इमारतीच्या खिडक्या फोडल्या.

खाली ओहायो स्टेट हाऊस आणि व्हाईट हाऊसच्या इमारतींची तुलना केली आहे. त्यातून फरक स्पष्ट होते.

HOuse.png

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, ओहायो स्टेट हाऊस येथील आंदोलनांचा व्हिडियो व्हाईट हाऊसच्या नावे फिरवला जात आहे.

Avatar

Title:व्हाईट व्हाऊसमध्ये आंदोलक घुसल्याचा हा व्हिडियो नाही; वाचा या व्हिडियोमागचे सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False