सध्या व्हायरल होत असलेला तो फोटो हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेचा नाही; वाचा सत्य

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका मुलीचा सामूहिक बलात्कारनंतर मृत्यू झाला. या पीडित मुलीचा फोटो म्हणून एक छायाचित्र शेयर केले जात आहे. सोशल मीडियावर अनेकांनी हाथरस प्रकरणातील पीडिताला न्याय देण्याची मागणी करीत हा व्हायरल फोटो पोस्ट केला.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत व्हायरल होत असलेला फोटो त्या पीडितेचा नाही, हे समोर आले.

काय आहे दावा?

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हा फोटो खरंच हाथरस पीडितेचा आहे का हे तपासले. सोशल मीडियावर विविध की-वर्डस द्वारे सर्च केले असता काही पोस्ट आढळल्या. विनय तिवारी नामक युजरने म्हटले की, ही मुलगी हाथरस पीडिता नाही. त्यांचा मित्र अजय याची ती बहिण आहे.

हा धागा पकडून अधिक शोध घेतल्यावर अजय जीतू यादव नामक व्यक्तीची प्रोफाईल मिळाली. त्याने 29 सप्टेंबर रोजी पोस्ट करून खुलासा केला की, सोशल मीडियावर हाथरस बलात्कार पीडितेचा म्हणून जो फोटो शेयर होत आहे तो चुकीचा आहे. माझ्या बहिणाचा 2018 साली निधन झाले होते. चंदिगड येथील एका हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी तिच्या फोटोसह एक मोहीम चालविली होती. परंतु, आता तो फोटो हाथरस प्रकरणाशी जोडून शेयर केला जात आहे. सर्वांना आवाहन आहे की, तसे करू नये.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

अजय जीतू कुमार यांच्या अकाउंटची तपासणी केल्यावर कळाले की, त्यांच्या बहिणीवर जुलै 2018 मध्ये चंदिगड येथील लँडमार्क हॉस्पिटलमध्ये सर्जरी करण्यात आली होती. परंतु, सर्जरीनंतर तीन दिवस ती शुद्धीवर आलीच नाही आणि तिचा मृत्यू झाला.

अजय जीतू कुमार यांच्या कुटुंबाने लँडमार्क हॉस्पिटलविरोधात आरोप केले की, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या बहिणीचा मृत्यू झाला. त्यांनी 22 जुलै 2018 रोजी हॉस्पिटल विरोधात धरणे आंदोलनही केले होते. 

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक 

विविध लोकांनी डॉक्टर आणि हॉस्पिटलवर कारवाई करावी म्हणून जुलै 2018 मध्ये सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या. 

विशेष म्हणजे अजय यांनी 24 जुलै 2018 रोजी फेसबुकवर त्यांच्या बहिणीच्या अंत्यसंस्काराचे फोटोदेखील शेयर केले होते. या पोस्टमध्ये त्यांचा गुलाबी ड्रेस घातलेला फोटोदेखील आहे.  

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

‘आज तक’ने हाथरस पीडितेच्या भावाशी संपर्क साधून व्हायरल होत असलेला फोटो पीडितेचा नाही हे स्पष्ट केले आहे. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, व्हायरल होत असलेला फोटो हाथरस पीडितेचा नाही. तो फोटो चंदिगड  येथील एका मुलीचा आहे. तिचा 2018 साली मृत्यू झाला होता.

Avatar

Title:सध्या व्हायरल होत असलेला तो फोटो हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेचा नाही; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •