फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांचे पोस्टर झळकले का? वाचा सत्य

Altered राजकीय | Political

कतारमध्ये सुरू असलेला फिफा विश्वचषक 2022 फुटबॉलऐवजी इतर गोष्टींसाठीच जास्त चर्चेत आहे. स्टेडियममध्ये कोणत्या वस्तू आणू शकता आणि कोणते कपडे घालू शकता यावरून गोंधळ सुरू आहे. या व्यतिरिक्त फुटबॉल सामन्यांदरम्यान राजकीय विधान करण्याचाही ट्रेंड दिसत आहे. 

सोशल मीडियावर सध्या एक फुटबॉल प्रेक्षक भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांचे पोस्टर हातात घेऊन उभा असल्याचा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा फोटो फिफा विश्वचषकादरम्यानचा आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीतअंत हा दावा खोटा असल्याचे कळाले आहे. मूळ फोटोमध्ये राहुल गांधीचे पोस्टर आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल फोटोसोबत म्हटले आहे की, “कतारच्या  फिफा वर्ल्ड कपमध्ये प्रेक्षकरांगेत ‘भीम आर्मी’चे प्रमुख चंद्रशेखर आझाद रावण यांचा फोटो झळकला.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पजताळणी

व्हायरल फोटोला गुगलवर रिव्हर्स ईमेज सर्च केल्यावर कळाले की, हे पोस्टर चंद्रशेखर आझाद यांचे नव्हते. निधीश कदयांगन या काँग्रेस समर्थकाने फेसबुकवर हाच फोटो शेअर केल्याचे आढळले. यामध्ये त्या व्यक्तीच्या हातात राहुल गांधी यांचे पोस्टर दिसते. 

या पोस्टमध्ये म्हटले की, फीफा विश्वचषकाच्या मैत्रीपूर्ण सामन्यादरम्यान मनू थॉमस नामक व्यक्तीने राहुल गांधी यांचे भारत जोडोचे पोस्टर आणले होते. 

मूळ पोस्ट – फेसबुक

मनु थॉमस यांच्या फेसबुक अकाउंटवर भेट दिल्यावर कळाले की, व्हायरल फोटोमध्ये तेच दिसत आहेत. फिफा विश्वचषक 16 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या सराव मॅच दरम्यान मनु थॉमस आणि त्याच्या मित्रांनी अनेक फोटो काढुन सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

यावरून स्पष्ट होते की, मनू थॉमस यांच्या मूळ फोटोला एडिट करून राहुल गांधींऐवजी चंद्रशेखर आझाद यांना दाखविण्यात आले आहे. 

व्हायरल फोटो आणि मूळ फोटो यामधील फरक खाली दिलेल्या तुलनात्मक फोटोत पाहू शकतो. 

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल फोटो बनावट असून पोस्टरवरभीम आर्मी’ प्रमुख चंद्रशेखर आझाद रावण नसून राहुल गांधी होते. खोट्या दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांचे पोस्टर झळकले का? वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Altered