मोदींमुळे आकाशातील पक्षी बेरोजगार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले का? विश्वास ठेवण्यापूर्वी सत्य वाचा

False राजकीय
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

दिल्ली निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या एका भाषणातील क्लिप सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये राहुल गांधी आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांकडे निर्देश करीत म्हणतात की, या पक्ष्यांपाशी रोजगार नसण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि आरएसएस जबाबदार आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या क्लिपची पडताळणी केली असता कळाले की, हा खोडसाळपणे एडिट केलेला व्हिडियो आहे. मूळ भाषणात राहुल गांधी यांनी तसे म्हटलेले नाही.

काय आहे पोस्टमध्ये?

एकुण 34 सेंकदाच्या या व्हायरल क्लिपमध्ये राहुल गांधी म्हणतात की, यहाँ पर मुझे बताओ, एक बात समझाओ, ये जो चील है, ये यहाँ क्यों उड़ रहे हैं? ये चील यहाँ क्या कर रहे हैं, कोई बता सकता है, ये चील यहाँ पर घूम रहे हैं, यहाँ क्यों घूम रहे हैं? पिछले 5 साल से उनको रोजगार नहीं मिल रहा है. इसका कारण नरेन्द्र मोदी हैं, इसका कारण आरएसएस है, इसका कारण बीजेपी है.

मूळ व्हिडियो येथे पाहा –  फेसबुकफेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

राहुल गांधी यांनी खरंच असे म्हटले का? हे तपासण्यासाठी सर्वप्रथम त्यांचे मूळ भाषण ऐकणे आवश्यक आहे. राहुल गांधी यांनी 5 फेब्रुवारी रोजी दिल्ली येथील कोंडली भागात केलेल्या भाषणातील ही क्लिप आहे. राहुल गांधीच्या संपूर्ण भाषणाचा 23 मिनिटांचा व्हिडियो काँग्रेसच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आलेला आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता.

संपूर्ण भाषण ऐकल्यावर कळते की, राहुल गांधी यांनी पक्ष्यांच्या बेरोजगारीसाठी मोदी, भाजप कारणीभूत आहेत असे म्हटलेले नाही. व्हायरल होत असलेली क्लिप राहुल गांधी यांचे वेगवेगळे वक्तव्य एकत्र करून खोडसाळपणे एडिट करण्यात आली आहे. ते तीन वाक्य असे:

1. यहाँ पर मुझे बताओ, एक बात समझाओ, ये जो चील है, ये यहाँ क्यों उड़ रही हैं? ये चील यहाँ क्या कर रही हैं, कोई बता सकता है, ये चील यहाँ पर घूम रही हैं, यहाँ क्यों घूम रही हैं? 

2. पिछले 5-साल से उन्हें रोजगार नहीं मिल रहा है. 

3. इसका कारण नरेन्द्र मोदी हैं, इसका कारण आरएसएस है. इसका कारण बीजेपी है.

एक-एक करत आपण याची पडताळणी करून

वाक्य 1

मूळ व्हिडियोच्या 9.37 मिनिटांपासून राहुल गांधी आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांकडे इशार करत म्हणतात:

यहाँ पर मुझे बताओ, एक बात समझाओ, ये जो चील है, ये यहाँ क्यों उड़ रही हैं? ये चील यहाँ क्या कर रही हैं, कोई बता सकता है, ये चील यहाँ पर घूम रही हैं, यहाँ क्यों घूम रही हैं? (समोर बसलेले लोक म्हणातात – आसपास जो गंदगी का ढेर है, ये वहाँ उड़ रही हैं) ये जो गंदगी है, आप बताओ मुझे इस गंदगी को हटाने के लिए आपको क्या लगता है कितने करोड़ रुपए लगेंगे? कितने लगेंगे, बताओ- 5 करोड़, 10 करोड़। ठीक हैं 50 करोड़ लग जाएंगे। नरेन्द्र मोदी जी ने कुछ ही दिन पहले हिंदुस्तान के सबसे अमीर लोगों का 1 लाख 30 हजार करोड़ रुपए टैक्स माफ किया है।

अर्थ- परिसरातील घाणीमुळे आकाशात पक्षी घोंघावत असल्याचे राहुल गांधी म्हणाले होते.


वाक्य 2

मूळ व्हिडियोच्या 3.01 मिनिटापासून राहुल गांधी म्हणतात:

युवा को ये नही समझ आ रहा है, इतने साल उन्होंने पढ़ाई की, स्कूल में, कॉलेज में, यूनिवर्सिटी में जाकर पढ़े, एग्जाम देते हैं। मगर पिछले 5 साल से उनको रोजगार नहीं मिल रहा है और किसी भी देश में अगर यूथ को, नई जनरेशन को रास्ता नहीं दिखता तो फिर यूथ के दिल में गुस्सा पैदा होता है। वो जो गुस्सा पैदा हो रहा है, उसका फायदा नरेन्द्र मोदी जी उठाते हैं। मगर गुस्से का सच्चा कारण बेरोजगारी है।

अर्थ- राहुल गांधी युवकांमध्ये बेरोजगारीविषयी बोलत होते.


वाक्य 3

मूळ व्हिडियोच्या 1.00 मिनिटापासून राहुल गांधी म्हणतात:

आपने हिंदुस्तान का माहौल देखा होगा कि पिछले 5 सालों में हिंदुस्तान का माहौल बिल्कुल बिगड़ गया है (…..) सबको मालूम है ना कि माहौल बिगड़ गया है? इसका कारण क्या है – बहुत सारे लोग कहेंगे कि इसका कारण नरेन्द्र मोदी हैं, इसका कारण आरएसएस है. इसका कारण बीजेपी है. मगर मैं थोड़ा सा बदल कर कहना चाहता हं, इसका सबसे बड़ा कारण है कि हिंदुस्तान की जनता को और खास तौर से जो हमारा युवा है, उसे रास्ता नहीं दिख रहा है.

अर्थ- देशात बिघडलेल्या परिस्थितीला मोदी, आरएसएस, भाजप जबाबदार असल्याचे राहुल गांधी बोलत होते.


राहुल गांधी यांचे संपूर्ण भाषणाची प्रत खाली वाचू शकता-

Shri_Rahul_Gandhi_-05.02.2020

निष्कर्ष

यावरून हे स्पष्ट होते की, राहुल गांधी यांनी पक्ष्यांमध्ये बेरोजगारीस नरेंद्र मोदी, भाजप किंवा आरएसएस कारणीभूत असल्याचे म्हटलेले नाही. राहुल गांधीचा व्हायरल व्हिडियो खोडसाळपणे एडिट केलेला आहे. तीन वेगवेगळ्या वाक्यांना एकत्र करून ही क्लिप तयार करण्यात आलेली आहे.

Avatar

Title:मोदींमुळे आकाशातील पक्षी बेरोजगार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले का? विश्वास ठेवण्यापूर्वी सत्य वाचा

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply