स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूयांना स्वामी विद्यानंद यांनी भरसभेत श्रीमुखात लगावली होती,असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. एका सभेत नेहरुंनी आर्यांना निर्वासित म्हटल्यामुळे रागावलेल्या स्वामी विद्यानंद यांनी त्यांच्या श्रीमुखात लगावत चांगलेच खडसावले होते, असे व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे. या घटनेचा फोटो म्हणून एक छायाचित्र सोबत दिलेले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळमी केली असता ही असत्य माहिती असल्याचे निष्णण्ण झाले.

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये म्हटले

की, ‘’स्वामी विद्यानंद यांनी 62 च्या पराभवानंतर नेहरूंच्या

श्रीमुखात

लगावली होती. कारण नेहरुंनी आपल्या भाषणात म्हटले होते की, आर्य भारतात निर्वासित

होते. हे ऐकून प्रमुख पाहुणे असलेले स्वामी विद्यानंद ताडकन उठले आणि व्यासपीठावर

जाऊन त्यांनी नेहरुंच्या श्रीमुखात भडकावली. त्यानंतर त्यांनी माईक ओढून घेतला आणिम्हणाले ‘‘आर्य निर्वासितनव्हते. ते माझे पूर्वज

होते आणि ते भारताचे मूळनिवासी होते; परंतु आपले (नेहरूंचे पूर्वज) अरब वंशाचे

होते आणि तुमच्यामध्ये त्यांचेच रक्त आहे. त्यामुळे तुम्ही वास्तवात या महान

देशाचे मूळनिवासीनाही...जर तुमच्या ऐवजी सरदार पटेल पंतप्रधान असते तर देश अशा खेदजनक

परिस्थितीत नसता.श्रीमुखात भडकावल्यानंतर नेहरुंनी

बदला घेण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना मागे घेण्यात आल्याचे फोटोत दिसते.

‘विदेह गाथा: एक आर्य संन्यासी की डायरी’ (पृष्ठ 637)नावाच्या पुस्तकात हा किस्सा दिला असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच स्वामींनी विद्यानंद यांनी लिहिलेल्या ‘नेहरू : उत्थान और पतन’ या पुस्तकावर 1963 साली बंदी घालण्यात आल्याचीह तळटीप जोडलेली आहे.

फेसबुकवरीलमूळपोस्ट

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम स्वामी विद्यानंद कोण आहेत हे जाणून

घेऊयात.

स्वामी

विद्यानंद ‘विदेह’ हे

वेदांचे विद्वान अभ्यासक होते. त्यांनी देशाविदेशात वेद आणि योग शिक्षणाचा प्रसार

केला. ते ‘वेद संस्थान’चे संस्थापक

आहेत. त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध पुस्तकांच्या यादीमध्ये‘नेहरू : उत्थान और पतन’ या पुस्तकाचा उल्लेख नाही. तसेच ‘विदेह गाथा’ या आत्मचरित्र ग्रंथामध्येही नेहरुंच्या श्रीमुखात

लगावल्याचा उल्लेख किंवा तशी माहिती विश्वासर्ह स्रोतांकडून देण्यात आलेली नाही.

भरसभेत पंतप्रधानांच्या

श्रीमुखात लावल्याची बातमी नक्कीच वर्तमानपत्रांत आली असती किंवा त्याविषयी

काहीतरी लिहिले गेले असते. परंतु, इंटरनेटवर तसे काहीच आढळले नाही. त्यामुळे या

दाव्याबाबत शंका निर्माण होते.

मग हा फोटो कुठला आहे?

पोस्टमधील फोटोलारिव्हर्स इमेजसर्च केल्यावर कळाले की, हा फोटो 1962 साली काँग्रेसच्या एका सभेतील आहे. असोसिएटेड प्रेस (AP) या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या वेबसाईटवर या फोटोसोबत कॅप्शन दिलेली आहे की, पाटणा येथे जानेवारी 1962 मध्ये काँग्रेसच्या एका सभेत गोंधळ झाल्यानंतर सुरक्षारक्षकाने पंतप्रधान नेहरूंचाजमावापासून असा बचाव केला.

एपी

इमेजसचे संकेतस्थळ/ Archive

सोबत असेही म्हटले की, 1962 वर्षांच्या शेवटी चीनने

भारतावर हल्ला केला होता. चीनने 20 ऑक्टोबर 1962 रोजी पहिला हल्ला केला होता.

याचा अर्थ की, हा फोटो भारत-चीन युद्धापूर्वीचा आहे. त्यामुळे चीनसोबतच्या

युद्धाच्या पराभवानंतर स्वामी विद्यानंद यांनी नेहरुंच्या श्रीमुखात लगावली होती

हा दावा खोटा ठरतो.

निष्कर्ष

हे छायाचित्र पाटणा येथे जानेवारी 1962 साली झालेल्या काँग्रेस पक्षाच्या सभेतील आहे. सभेत गोंधळ उडाल्यानंतर सुरक्षारक्षक नेहरुंचा बचाव करतानाचा हा फोटो आहे. हा फोटो भारत-चीन युद्धापूर्वीचा आहे. तसेच स्वामी विद्यानंद ‘विदेह’ यांनी नेहरुंच्या श्रीमुखात लगावल्याची कुठेही नोंद नाही. त्यामुळे ही पोस्ट असत्य माहिती देते.

Avatar

Title:स्वामी विद्यानंद यांनी जवाहरलाल नेहरुंच्या श्रीमुखात लगावली होती का? वाचा या फोटोमागचे सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse

Result: False