राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नाव बदलण्यात आल्याची फेक न्यूज व्हायरल; वाचा सत्य

False राजकीय

राष्ट्रपती भवानील प्रसिद्ध मुघल गार्डनचे नाव बदलण्यात आल्याचे मेसेज आणि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात म्हटले जात आहे की, मुघल गार्डनला आता माजी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचे नाव देण्यात आले आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली असता ही फेक न्यूज असल्याचे कळाले.

काय आहे पोस्टमध्ये?

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

राष्ट्रपती भवन परिसरात 15 एकर जागेवर पसरलेल्या मुघल गार्डनला देशाविदेशातून पर्यटक भेट देतात. जम्मू व काश्मीर आणि ताजमहाल येथे असलेल्या मुघल गार्डनवरून हा खास बगीचा तयार करण्यात आला होता. राष्ट्रपती भवनाचा आत्मा, असे याचे वर्णन केले जाते.

तर अशा या जगप्रसिद्ध बागेचे नाव बदलण्यात आले का याचा शोध घेतला. इंटरनेटवर अशी एकही बातमी आम्हाला आढळली नाही. या बागेचे नाव बदलणे ही मोठी बातमी ठरली असती. पण तसे काहीच आढळत नाही.

राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत वेबसाईट किंवा सोशल मीडिया अकाउंट्सवरदेखील याबाबत काही माहिती उपलब्ध नाही. 

मग खरं काय आहे? 

केंद्रीय पत्र व सूचना विभागाच्या तथ्य पडताळणी विभागाने (पीआयबी) मुघल गार्डनचे नाव बदलण्याविषयी खुलासा प्रसिद्ध केल्याचे आम्हाला सापडले. ट्विटरवर पीआयबीने म्हटले की, राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नाव बदलण्यात आलेले नाही. या बागेचे नाव बदलण्याच्या सर्व बातम्या खोट्या आणि तथ्यहीन आहेत.

अर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, सरकारने मुघल गार्डनचे नाव बदलण्यात आलेले नाही. त्यामुळे राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नाव बदलून त्याला माजी राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांचे नाव देण्यात आल्याची माहिती खोटी आहे.

Avatar

Title:राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नाव बदलण्यात आल्याची फेक न्यूज व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False