सोनिया गांधी यांच्या फोटोसमोर उद्धव ठाकरे नतमस्तक झाल्याचा फोटो खोटा. वाचा सत्य

False राजकारण | Politics

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतानाचे एक छायाचित्र सोशल मीडियावर बरेच गाजत आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या रूपाने महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असून, सोनिया गांधी यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. यापार्श्वभूमीवर हा फोटो फिरत आहे. यावरून अनेक लोक त्यांच्यावर टीका करीत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची तथ्य पडताळणी केली.

Shruti Gaonkar FB Post.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी

फोटोची सत्यता जाणून घेण्यासाठी गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले असता द हिंदू या दैनिकाच्या संकेतस्थळावरील एक वृत्त दिसून आले. या वृत्तात महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर मातोश्री निवासस्थानी परतताच उद्धव ठाकरे हे थेट बाळासाहेबांच्या खोलीत जाऊन त्यांच्या प्रतिमेपुढे नतमस्तक झाले, असे म्हटले आहे. 

screenshot-www.thehindu.com-2019.11.27-19_08_05.png

द हिंदू / Archive

दैनिक महाराष्ट्र टाईम्स, इंडिया टूडेच्या संकेतस्थळानेही याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केलेले आहे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या व्हेरिफाईड ट्विटर खात्यावरुनही हे छायाचित्र ट्विट करण्यात आले ते आपण खाली पाहू शकता.

Archive  

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आणि खुद्द उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या व्हेरिफाईड ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आलेल्या छायाचित्रानुसार या मूळ छायाचित्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दिसत आहेत. या मुळ छायाचित्रात फोटोशॉप करुन काही बदल करुन ते चुकीच्या माहितीच्या आधारे समाजमाध्यमात पसरविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. खोट्या आणि खऱ्या छायाचित्रांची केलेली तुलना आपण खाली पाहू शकता.

2019-11-27.jpg

निष्कर्ष 

उद्धव ठाकरे आपल्या वडिलांच्या फोटोसमोर नतमस्तक झाले होते. या मूळ छायाचित्रात फेरबदल करुन बाळासाहेब ठाकरे यांच्या जागी सोनिया गांधींचा फोटो टाकून ते चुकीच्या पद्धतीने पसरविण्यात येत आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणी ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:सोनिया गांधी यांच्या फोटोसमोर उद्धव ठाकरे नतमस्तक झाल्याचा फोटो खोटा. वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False